Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthजेवणावर फुंकर मारणं बाळासाठी धोक्याचं

जेवणावर फुंकर मारणं बाळासाठी धोक्याचं

Subscribe

घरातील लहान बाळाची काळजी घेताना नकळत आपल्याकडून आरोग्याच्या सवयींकडे दुर्लक्ष होते. आपल्या अनेकांच्या घरात सर्रासपणे आढळून येते, ती म्हणजे, बाळाला भरवताना त्याचे तोंड पोळू नये म्हणून आपण त्याच्या जेवणार अलगद फुंकर मारतो. मात्र, तुम्ही मारलेली फुंकर त्याच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.

बाळाच्या जेवणावर फुंकर मारणे का टाळावे?

This Is Why You Should Never Blow On Your Baby's Food | HerZindagi

- Advertisement -
  • फुंकर मारताना आपल्या तोंडावाटे अनेक जिवाणू बाहेर पडतात. त्यात जर तुमचे दात किडले असतील तर तुम्ही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण जर तुमचे दात किडले असतील तर तुमच्या केवळ एका फुंकीने जिवाणू बाळाच्या तोंडात जाऊ शकतात.
  • दात किडण्यासाठी कारणीभूत ठरणारे जिवाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे सहज पसरवले जातात. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या बाळाच्या जेवणावर फुंकर मारत असाल तर काळजी घ्या.
  • कारण या फुंकीद्वारे दात किडण्यासाठी कारणीभूत जिवाणू अन्नामध्ये मिसळून तुमच्या बाळाला दात किडण्याची समस्या देऊ शकते.
  • दात किडण्यासाठी कारणीभूत ठरणार्‍या स्ट्रेप्टो कोकस मुटान्स नामक जीवाणूशी लढा देण्यास लहान मुलांचे दात कमकुवत असतात. लहान मुलांच्या दातांमध्ये अडकलेले अन्नघटक खाताना स्ट्रेप्टो कोकस मुटान्स विशिष्ट प्रकारचे आम्ल दातांवर सोडतात. या जिवाणूंच्या संपर्कात आल्यास मुलांचे दात पूर्ण विकसित होण्याआधीच दात किडण्याची प्रक्रिया सुरू होते.

हेही वाचा :

- Advertisment -

Manini