घरमहाराष्ट्रRule Changes: सिलिंडरच्या किमतीत बदल ते पेन्शनचे नियम बदलणार; 1 फेब्रुवारीपासून 'या'...

Rule Changes: सिलिंडरच्या किमतीत बदल ते पेन्शनचे नियम बदलणार; 1 फेब्रुवारीपासून ‘या’ आर्थिक नियमांमध्ये बदल

Subscribe

1 फेब्रुवारीपासून अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

मुंबई: उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. 1 फेब्रुवारीपासून अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे कोणकोणते नियम बदलणार याविषयी जाणून घेऊया. (Rule Changes Changes in cylinder prices will change pension rules Changes in these financial rules from 1st February)

LPG सिलिंडरचे दर बदलणार?

अर्थसंकल्पाच्या दिवशी संपूर्ण देशाच्या नजरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणावर असतील. मात्र, त्यांच्या भाषणाच्या सुरूवातीलाच LPGच्या किमतीतील बदलाकडेही लक्ष असणार आहे. कारण, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल आणि सिलिंडरच्या किमती बदलतात. सिलिंडरच्या दरातील बदलांमुळे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये चढ-उतार होत आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी LPG वर सूट मिळते की नाही ते पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

NPS मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार

पेन्शन फंड रेग्लुलेटरी अँड डेव्हलपमेटं अथॉरिटी (PFRDA) ने 12 जानेवारी 2024 रोजी पेन्शनची आंशिक पैसे काढण्यासाठई आणि कायद्याचे पालन करण्याची हमी देण्यासाठी एक मास्टर परिपत्रक जारी केलं होतं. हे 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू होईल. NPS खातेधारक त्यांच्या वैयक्तिक पेन्शन खात्यातील योगदानाच्या 25 टक्क्यांपर्यंत काढू शकतात. यामध्ये खातेदार आणि नियोक्ता दोघांच्याही योगदानाच्या रकमेचा समावेश असेल. यानुसार, जर तुमच्या नावावर आधीच घर असेल तर त्यासाठी NPS खात्यातून आंशिक पैसे काढता येणार नाहीत.

IMPS नियम बदलणार

1 फेब्रुवारीपासून IMPSच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. आता तुम्ही 1 पासून लाभार्थींचे नाव न जोडता थेट बँक खात्यांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित करू शकता. न‌ॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( NPCI) ने 31 ऑक्टोबर 2023 रोजी हे परिपत्रत जारी केले होते. बँक खात्यातील व्यवहार जलद आणि अधिक अचूक करण्यासाठई NPCI ने IMPS चे नियम बदलले आहेत. NPCI नुसार, तुम्ही फक्त फोन नंबर आणि प्राप्तकर्त्याचे किंवा लाभार्थीचे बँक खाते नाव टाकून पैसे पाठवू शकता.

- Advertisement -

(हेही वाचा: Maratha Vs OBC : रस्त्यावरील लढा आता न्यायालयात; अधिसूचनेविरोधात ‘ओबीसी’ हायकोर्टात!)

KYC लिंक नसलेले फास्टॅग निष्क्रिय

केवायसी नसलेले फास्टॅग 31 जानेवारीनंतर बँकांद्वारे निष्क्रिय किंवा काळ्या यादीत टाकले जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाचे उल्लंघन करून एका वाहनाला अनेक फास्टॅग जारी केल्याच्या आणि KYC शिवाय फास्टॅग जारी केल्याच्या अलीकडील अहवालानंतर NHAI ने हे पाऊल उचलले आहे. जर तुमच्याकडे तुमच्या फास्ट‌ॅगसाठी KYC नसेल तर ते 31 तारखेपर्यंत पूर्ण करा अन्यथा ते 1 फेब्रुवारी 2024 पासून निष्क्रिया होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -