…म्हणून फक्त हसत रहा आणि हसवत रहा!

…म्हणून फक्त हसत रहा आणि हसवत रहा!

म्हणून फक्त हसत रहा

आयुष्यात दुख बाजूला ठेऊन सुखाचा विचार करा. तसेच सतत हसत राहिल्यामुळे आरोग्य चांगले राहते. मात्र नेमके काय आणि कोणते फायदे होतात ते जाणून घ्या.

हृदयाचा व्यायाम होतो

हसण्यामुळे टेन्शन आणि डिप्रेशन कमी होते. तसेच सतत हसण्याने हृदयाचा देखील व्यायाम होतो. त्याचप्रमाणे रक्त प्रवाह देखील चांगल्या प्रकारे होतो. हसताना, शरीरातून रासायनिक द्रव्य एंडॉर्फिन सोडले जाते आणि हे द्रव्य आपल्या हृदयाला मजबूत बनवते. त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.

ऑक्सिजनची पातळी वाढते

एका संशोधनानुसार हसण्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते. तसेच ऑक्सिजनच्या उपस्थितीत, कर्करोगाच्या पेशी आणि अनेक प्रकारचे हानिकार जिवाणू आणि व्हायरस नष्ट होतात. तसेच हसण्याने आपल्याला अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

सतत हसण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हसण्यामुळे सकारात्मक उर्जा देखील वाढते.

चांगली झोप लागते

सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना जर हास्य ध्यान योग केले तर दिवसभर आपण आनंदी राहतो. तसेच चांगली झोप देखील लागते. हास्य योगामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या हार्मोन्सचा स्राव होतो. ज्यामुळे मधुमेह आणि पाठीचे दुखणे कमी होते.

लठ्ठपणा नियंत्रणात राहतो

दररोज १ तास हसण्याने ४०० कॅलरीज ऊर्जाचा वापर होतो, ज्यामुळे लठ्ठपणा देखील नियंत्रणात राहतो.

First Published on: April 15, 2019 3:40 PM
Exit mobile version