असा द्या तुमच्या पाल्याला वेळ!

असा द्या तुमच्या पाल्याला वेळ!

family

आजच्या महागाईत वावरताना तसेच न संपणार्‍या ईच्छांची यादी पूर्ण करताना अनेकदा कुटुंबातील आई-बाबांना नोकरीस जाणे भाग असते. अशावेळी पालक आपल्या पाल्याला पाळणा घरात ठेवणे पसंत करतात. यामुळे मुलांना आपल्या पालकांचा वेळ आणि सहवास मिळत नाही. काही पालक कामाचा ताण मुलांवर काढतात. मुलांचा आपल्या कामात व्यत्यय नको म्हणून त्याच्या हातात महागडे फोन्स देऊन त्यांचे भाव विश्व मर्यादित करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे नोकरी-घर सांभाळत असा वेळ तुम्ही आपल्या पाल्याला देऊ शकतात.

* घरी असल्यास मुलांना वेळ द्या
घरी असल्यास शक्यतो ऑफिसचे काम न करता मुलांशी गप्पा मारा. त्यांच्या हातात फोन, टी.व्ही.चे रिमोट न देता मुलांना बागेत, बाहेर खेळायला घेऊन जा. घरात बैठे खेळ खेळा. एखाद्या कलेबद्दल त्यांना शिकवण द्या.

* शॉपिंगचा वेळ
गरज असल्यासच मॉल किंवा बाहेर खरेदीसाठी जा. हा जास्तीचा वाया जाणारा वेळ मुलांसोबत घालवा. त्यांच्या आवडी-निवडीचा विचार करा.

* मुलांच्या वयाचे व्हा                                                                                                     आपल्या पाल्यांच्या वयाचे होऊन तुम्ही वागलात तर मुलं मोकळेपणाने वागतील. घरी असल्यास मुलांना वेळ देताना तुमच्यातील मोठा व जबाबदार व्यक्ती बाजूला ठेऊन लहान मूल व्हा.

* कमी वेळ सोशल साईट्सला द्या
आजचे पालक सोशल साईट्सचा अधिक वापर करतात. त्यावर अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल साईट्सवर अ‍ॅक्टिव्ह राहण्यापेक्षा मुलांसोबत जास्त वेळ अ‍ॅक्टिव्ह रहा.

* मुलांचे कला-गुण ओळखा
मुलांना चांगली कला अवगत व्हावी यासाठी त्यांना योग्य त्या कलेचे प्रशिक्षण द्या. जेणेकरून मुलं त्यात रमतील आणि एखाद्या कलेत प्राविण्य मिळवतील.

First Published on: February 1, 2019 5:38 AM
Exit mobile version