खमंग मुगाचा इडली ढोकळा

खमंग मुगाचा इडली ढोकळा

lifestyle moong idli dhokla recipes

मूग आणि मूगडाळीचे अनेक प्रकार आतापर्यंत आपण खाल्ले असतील. चली तर आज मूगडाळीपासून तयार होणारा इडली ढोकळा हा वेगळा पदार्थ पाहूया.

साहीत्य- १ वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, अर्धी वाटी कोमट पाणी, अर्धी वाटी आंबट ताक, अर्ध्या लिंबाचा रस, मिरची बारीक करून, आलं, हळद, चवीपुरते मीठ, साखर 1 चमचा, पाव चमचा खाण्याचा सोडा, अर्धा टे.स्पून तेल, तेलाची फोडणी

कृती- सर्वप्रथम एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, अर्धी वाटी आंबट ताक आणि अर्धी वाटी कोमट पाणी घालून मुग भिजवून एका पातेल्यात ५ ते ६ तास झाकून ठेवावे. त्यानंतर पीठ फुगून वर आले की त्यात आले, मिरची, मीठ, हळद, अर्धा लिबांचा रस, अर्धा चमचा तेल घालावे. त्यानंतर इडली पात्रात तळाला पाणी घालून गॅसवर ठेवावे. पण्याला उकळी आली की मिश्रणात सोडा घालून चांगले हलवून इडलीपात्रात ठेवावे. ढोकळा तयार होतोय तोवर लहानश्या कढईत किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी, हिंग, हळद, घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होऊ द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे. १० ते १५ मिनिटांनी गॅस बंद करावा. इडली ढोकळा जरा थंड झाला की पात्रातून काढून त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी आणि वर छान कोथिंबीर घालावी.

First Published on: March 1, 2020 8:00 AM
Exit mobile version