Corona Pandemic: लॉकडाऊन काळात मांजरांना आलं डिप्रेशन!

Corona Pandemic: लॉकडाऊन काळात मांजरांना आलं डिप्रेशन!

गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वांना जगणं अशक्य केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात सर्वच देश लॉकडाऊन असताना सगळेच घरात होते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. मात्र तुम्हाला माहित आहे का? माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांवर देखील कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरवर काही मांजर प्रेमींच्या एका ऑनलाईन सत्राद्वारे ही धक्कादायक माहिती समोर आली. कोरोनाकाळात कुटुंबातील माणसे दिवसभर घरी असल्यामुळे मांजरी वैतागल्या असल्याचे एका मांजर प्रेमींनी सांगितले. तर पशूवैद्यांनी अशा कित्येक नैराश्यग्रस्त मांजरीवर लॉकडाऊनदरम्यान उपचार केले असल्याचे सांगितले.

लॉकडाऊनमध्ये संपूर्ण घरात विनाहस्तक्षेप मांजराचा वावर होत नसल्याने त्या नाराज असल्याचे एका ट्विटर युजर्सने सांगितले. एका युजर्सने असे सांगितले की, त्या खूप मोकळ्या राहत नाही किंवा खूप वेळ मस्ती करत नाही, धावत नाही, नेहमी झोपलेल्या असतात. पाळीव मांजरीना त्यांचा स्वत:चा असा वेळ हवा असतो आणि हाच मोकळा वेळ लॉकडाऊन काळात माजंरींना मिळाला नसल्याचे समोर आले. मांजरीना लॉकडाऊनच्या काळात नैराश्य आले हे थोडं हास्यास्पद असले तरी पण संशोधनातूनही ही माहिती समोर आली आहे.

या संशोधनात ऑस्ट्रेलियातील जेम्स कुकमधील युनिवर्सिटीमध्ये ४०० पाळीव प्राणी आणि त्यांच्या पालकत्व स्वीकारलेल्या प्राणीप्रेमींनी यामध्ये सहभाग घेतला होता. कोरोनाकाळात एकमेकांसोबत घालवलेल्या वेळाचा त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला याचा अभ्यास करण्यात आला. संशोधक डॉ, जेसिका ऑलिव्हिया यांनी यासंदर्भात असे सांगितले की, जवळपास ५० टक्के मांजरी त्यांच्या मालकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होत्या. तर जवळपास १०० टक्के कुत्र्यांच्या मालकांनी सांगितले की, ”त्यांच्या कुत्र्यांना त्यांचे मालक पुर्ण वेळ घरी असल्याचा खूप आनंद झाल्याचे समोर आले. कोरोना काळाता मांजरीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो हे धक्कादायक होते. नेहमी एकट्या राहणाऱ्या मांजरीसाठी अचानक सतत कोणासोबत तरी राहणे, विशेषत: लहान मुलांसोबत राहणे हा खूप मोठा बदल होता. हा बदल स्वीकारायला मांजरींना खूप वेळ लागत असल्याचे पशुवैद्यकीय वर्तणूकशास्त्रज्ञ स्टेफनी बोर्न्स-वेइल यांनी सांगितले.


अदानी पॉवरच्या नफेखोरीला मोठा झटका, वाढीव वीजदरातून ग्राहकांची सुटका
First Published on: September 18, 2021 9:45 PM
Exit mobile version