Makar Sankranti 2023 : कुंडलीत शनिदोष दूर करण्यासाठी मकर संक्रांतीला करा काळ्या तीळाचे उपाय

हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. 2023 मध्ये 15 जानेवारीला संक्रांत साजरी केली जाईल. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्याची उपासना, स्नान-दानाचे देखील विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीला तीळ गूळ खाण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी शास्त्रात काळ्या तीळासंबंधीत काही उपाय देखील सांगितले जातात.

काळ्या तीळाचे उपाय

Benefits Of Black Sesame Seeds: 5 Surefire Benefits Of Black Sesame Seeds Including Blood Pressure And Constipation - Kale Til Ke Fayde: ब्लड प्रेशर, कब्ज समेत काले तिल के पांच अचूक फायदे

  • मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा पौष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी काळे तीळाचे दान करा. यामुळे राहू-केतूच्या अशुभ परिणामांपासून सुटका होते.
  • पौष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ दान केल्याने कालसर्प योग आणि पितृदोष देखील कमी होतो.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनीची साडेसाती सुरु असेल अशांनी पौष महिन्यातील प्रत्येक शनिवारी वाहत्या पाण्यात काळे तीळ प्रवाहित करा. हा उपाय केल्यास शनिदोष कमी होतो.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा पौष महिन्यामध्ये प्रत्येक शनिवारी काळ्या तीळांसोबत काळी उडीद काळे कपडे दान केल्यास आर्थिक समस्या सतावत नाही.
  • आयुष्यातील अडचणी, त्रास कमी करण्यासाठी ऊँ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत प्रत्येक शनिवारी दूधामध्ये काळे तीळ मिळवून पिंपळाच्या झाडावर अर्पण करा.

 


हेही वाचा : Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीच्या दिवशी करा ‘या’ महत्त्वाच्या नियमांचे पालन