Monday, April 29, 2024
घरमानिनीSummer Vegetables : उन्हाळ्यात या भाज्या खाणे फायदेशीर

Summer Vegetables : उन्हाळ्यात या भाज्या खाणे फायदेशीर

Subscribe

उन्हाळा आला की तहान अधिक लागते त्यामुळे लोकांचा आहारही कमी होतो. पण उन्हाळ्यात खाण्यापिण्याबाबत थोडी निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. उन्हाळ्यात उलट्या, जुलाब, पोटदुखी, गॅस, अपचन अशा पोटाच्या समस्या अधिक जाणवतात. बहुतांश तरुणमंडळी हिरव्या पालेभाज्या किंवा फळभाज्या खाण्याचा कंटाळा करतात. अशा परिस्थितीत पोट थंड ठेवणे आवश्यक आहे. आपल्या आहारामध्ये पालेभाज्या तसंच फळभाज्यांचा समावेश असावा, असे अन्नशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे .कारण हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरातील रक्त वाढविण्यासाठी खूप उपयुक्त असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मिळते. पालक, मेथी, चवळी, शेपू अशा अनेक भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आढळतात. तसेच आपल्या डॉक्टरही हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात.

दुधी भोपळा

Dudhi at Rs 11/piece | लौकी in Nashik | ID: 22403520897दुधी भोपळा पोषक तत्वांचा खजिना मानला जातो. उन्हाळ्यात दुधी भोपळ्याची भाजी खूप फायदेशीर असते. यामध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

- Advertisement -

शेवग्याच्या शेंगा 

Know The Health Benefits Of Drumstick In Detail Why Should We Eat Drumstick  Marathi News | Drumstick Benefits : आरोग्याकरता शेवग्याची शेंग आहे  फायदेशीर; जाणून घ्या सविस्तर

उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा नक्की खाव्यात. पचनक्रियेशी संबंधित आजार शेवग्याच्या सेवनाने नष्ट होतात. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून प्यायल्यास आराम मिळतो. यामध्ये भरपूर फायबर असते. शेंगामध्ये व्हिटॅमिन के, प्रथिने, लोह, जस्त आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक असतात.

- Advertisement -

पडवळ

पडवळ खायला आवडत नाही? हे फायदे वाचाच!

पडवळमध्ये मोठ्या प्रमाणात पोषणतत्त्वे आहेत. मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार आणि मलेरिया यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी पडवळ ही भाजी अतिशय प्रभावी आहे. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे. विशेष म्हणजे यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी आहे. यामध्ये खनिजांचा साठा आहे. पडवळमध्ये फॉस्फोरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखे पोषकतत्त्व आहेत. महत्त्वाचे म्हणजे पडवळ हे पचनास अतिशय हलके आहे.

काकडी

काकडी खाण्याची आवड असेल, तर हे 3 नुकसानदेखील जाणून घ्या

काकडी सलाड म्हणूनही खाऊ शकता. त्यात भरपूर पाणी असते. यामुळेच या हंगामामध्ये काकडीचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. त्यात व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी असते आणि त्यात जवळपास 90 टक्के पाणी देखील असते.

कारलं

करेले के पत्ते हैे बीमारियों का काल! सेहत के लिए हैं वरदान – TV9 Bharatvarsh

कारल्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ते पचनसंस्था निरोगी ठेवते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे कारले खाणे फायदेशीर ठरते.

________________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini