Thursday, December 7, 2023
घरमानिनीBeautyगुलाब पाणीच नव्हे गुलाबाचे तेल देखील अत्यंत फायदेशीर

गुलाब पाणीच नव्हे गुलाबाचे तेल देखील अत्यंत फायदेशीर

Subscribe

गुलाब हे फूल आंतरराष्ट्रीय फूल म्हणून ओळखते जाते. गुलाबाचे फुल प्रेम, पवित्रता, विश्वास आणि सौंदर्य यांचे प्रतीक आहे. सर्वाधिक लोकप्रिय आणि वापरले जाणारे गुलाब जल त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. त्वचेतील घाण बाहेर काढून त्वचा उजळवण्यासाठी गुलाब जलचा वापर केला जातो. मात्र, गुलाब पाण्याइतकेच गुलाबाचे तेल देखील तितकेच फायदेशीर आहे.

गुलाबाच्या तेलाचे फायदे

Rose Oil: What are the Benefits and Uses of This Essential Oil?

- Advertisement -
  • गुलाबाचे तेल त्वचेवर लावल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. ते त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते, ज्यामुळे कोरड्या आणि निर्जीव त्वचेपासून मुक्त होते.
  • रोज चेहऱ्यावर गुलाबाचे तेल लावल्याने सुरकुत्या आणि डाग कमी होण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन-ए आणि सी असते. हे पोषक तत्व त्वचेच्या आत जातात आणि यामुळे नवीन पेशी विकसित होतात.
  • धूळ आणि मातीमुळे त्वचेचा रंग निस्तेज होतो. अशा स्थितीत गुलाबाचे तेल त्वचेवर लावल्याने त्वचा एक्सफोलिएट होण्यास मदत होते. हे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

Essential Rose Oil Stock Photo - Download Image Now - Essential Oil, Rose -  Flower, Cooking Oil - iStock

  • सूर्यप्रकाशामुळे होणार्‍या सनबर्नपासून आराम मिळवण्यासाठी गुलाब तेलाचा वापर केला जाऊ शकतो.
  • गुलाबाच्या तेलाच्या मदतीने जखमा लवकर बऱ्या होतात.
  • या तेलात अँटिसेप्टिक गुणधर्म आढळतात, जे आपल्याला जंतूंपासून वाचवतात.
  • या तेलाच्या वापराने तणाव देखील कमी होतो.

चेहऱ्यावर गुलाब तेल कसे लावावे?

Rose oil is beneficial in removing stress, skin spots and wounds, know its  benefits | तनाव, स्किन पर दाग-धब्बे और घाव दूर करने में गुलाब का तेल है  फायदेमंद, जानिए इसके फायदे -

- Advertisement -

गुलाबपाण्याप्रमाणेच तुम्ही गुलाबाचे तेल टोनर किंवा फेस पॅकमध्ये मिसळून वापरू शकता. याशिवाय तुम्ही नाईट क्रीम म्हणून चेहऱ्यावर गुलाबाचे तेलही लावू शकता.

 


हेही वाचा :

कॉम्बिनेशन स्किनची अशी घ्या काळजी

- Advertisment -

Manini