Sunday, May 12, 2024
घरमानिनीDry Flowers : वापरलेल्या फुलांपासून असे बनवा सुगंधित धूप

Dry Flowers : वापरलेल्या फुलांपासून असे बनवा सुगंधित धूप

Subscribe

देवघरात किंवा घरात अगरबत्ती लावल्यास वातावरण प्रसन्न होते. असे मानले जाते त्याचा सुगंध सकारात्मकता आणतो आणि ज्या वस्तूपासून ते तयार केले जाते. त्यामध्ये असे गुणधर्म असतात जे वातावरण शुद्ध करतात. अनेक प्रकारच्या सुगंधित अगरबत्ती मार्केटमध्ये उपलब्ध असतात. पण तुम्ही घरी देखील अशा सुगंधित अगरबत्ती तयार करू शकता.

प्रत्येकाला ताजी, सुंदर आणि रंगीबेरंगी फुले आवडतात. सजावट असो वा कोणताही विधी, ते अनेक प्रकारे वापरले जातात, आम्ही तुम्हाला वाळलेल्या फुलांच्या मदतीने अगरबत्ती कशी बनवायची ते सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा तर सुगंधित होईलच, शिवाय बाजारातून अगरबत्ती खरेदी करण्याचा वेळ आणि खर्चही वाचेल.

अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • 5-7 झेंडूची फुले
  • 6-8 गुलाब
  • 1-2 तेजपान
  • 3 कापूर
  • कोळसा आणि शेणाचे भांडे
  • धूप जाळणारा
  • हवण सामग्री
  • ३ चमचे तूप
  • 2 टीस्पून तीळाचे तेल
  • 1 चमचा मध

अगरबत्ती बनवण्याची पद्धत:

  • अगरबत्ती बवण्यासाठी सर्वात पहिले वाळलेली फुले, कोळशाचा एक छोटा तुकडा, वाळलेले शेण , तेजपान, चंदन आणि हवन पावडर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करावे. हे मिश्रण चाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे.
  • पावडर तयार झाल्यानंतर त्यामध्ये तूप, तिळाचे तेल, मध आणि पाणी मिक्स करावे. लक्षात ठेवा की पाण्याचे प्रमाण 2-3 चमचे पेक्षा जास्त नसावे.
  • सर्व गोष्टी एकजीव झाल्या आणि मिश्रण थोडे घट्ट झाले की, उदबत्तीप्रमाणे हाताने गुंडाळा. आता त्यांना एक-दोन दिवस उन्हात वाळवू द्या, तुमच्या घरी बनवलेल्या हर्बल अगरबत्ती तयार आहेत.

या गोष्टी ठेवा लक्षात :

  • पावडर खूप कोरडी वाटत असेल तर त्यात तिळाचे तेल किंवा तुपाचे प्रमाण वाढवावे.
  • जर तुम्हाला जास्त सुगंध आवडत असेल तर तुम्ही त्यात सुगंधित तेल घालू शकता किंवा कापूरचे प्रमाण वाढवू शकता.
  • तसेच झेंडू किंवा गुलाबाऐवजी तुम्ही कोणतेही सुवासिक फूल वापरू शकता.
  • याशिवाय, अगरबत्ती पूर्णपणे कोरडी असावी हे लक्षात ठेवावे.
  • अन्यथा ती पेटवण्यास अडचण येऊ शकते.
- Advertisment -

Manini