घरमहाराष्ट्रThackeray group : भाजपा हा शेठजींचा पक्ष आणि सावकारी हाच त्यांचा धंदा,...

Thackeray group : भाजपा हा शेठजींचा पक्ष आणि सावकारी हाच त्यांचा धंदा, ठाकरे गटाची टीका

Subscribe

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत भाजपाच्या नेत्यांनी एक इरसाल प्रश्न विचारला आहे, तो म्हणजे जरांगे यांच्या आंदोलनास पैसे कोठून येतात? याचे सामान्य जनतेच्या मनातले उत्तर असे की, ‘‘महाराष्ट्रात आमदार-खासदार खरेदीसाठी जेथून पैसे येतात तेथूनच ते येत असावेत.’’ भाजपा हा शेठजींचा पक्ष आहे आणि सावकारी हाच त्यांचा धंदा आहे. त्यामुळे या सावकारीचीही एसआयटी चौकशी होऊ द्या, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

हेही वाचा – Maharashtra Budget Session : मुंबई आयुक्तांची बदली करा, वर्षा गायकवाड यांची विधानसभेत मागणी

- Advertisement -

मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न इतक्या दिवसांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपातील टोळीस पडला आहे. पण दुसऱ्यांचे भाडोत्री खांदे वापरून बार उडविण्याचे खेळ शिवसेना कधीच करीत नाही. अशा खेळांत सध्याचा भाजपा पारंगत आहे, असे सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटाने सुनावले आहे.

कायद्याचे राज्य हे सगळ्यांसाठी समानच असायला हवे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास हवा देणारे आणि उपोषणस्थळी त्यांना सरकारी निरोप देणारे कोण होते? याचा तपास ‘फोन टॅपिंग’फेम पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केला तर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत खरी माहिती पोहोचेल, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BMC : मुंबई पालिका आयुक्त चहल यांची होणार बदली; गगराणी आणि म्हैसकर यांची नावे चर्चेत

जरांगे पाटील यांचे आंदोलन पेटले, तेव्हा फडणवीस सरकारमधील छगन भुजबळ यांची भाषा मंत्रीपदास शोभणारी नव्हती. ‘मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरकार स्वीकारीत नाही, त्याला मी काय करू?’ असे भुजबळ म्हणत होते. त्यामुळे बेताल विधाने करणारे फक्त जरांगे हेच नाहीत, तर सरकारमधील लोक तसेच आहेत, पण गुन्हे दाखल झाले ते जरांगे व एक हजार मराठा कार्यकर्त्यांवर, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

आता जरांगे यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी भाजपातील आमदारांना तयार केले. आता जशास तसे उत्तर म्हणजे काय? भाजपाच्या टोळधाडीस महाराष्ट्रात शांतता नांदावी असे वाटत नाही काय? जरांगे यांचे बोलविते धनी जे कोणी असतील ते असतील, पण जरांगे यांना बळ देणारे आणि आंदोलनात हवा भरणारे ‘हवाबाण हरडे’ देवेंद्र फडणवीस यांच्या बगलेतच आहेत. उगाच दुसऱ्यांकडे कशाला बोटे दाखवता? असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Narendra Modi : साईबाबांनी मोदींना बसवलं आहे, ते सगळं व्यवस्थित करतील – सुरेश वाडकर

राज्याच्या काही भागांत तणाव आहे. हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. काही भागांत संचारबंदी आहे. जरांगे हे मागे फिरले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक होऊ शकेल. अशा प्रकारे जरांगे यांचा करेक्ट कार्यक्रम शिंदे-फडणवीस सरकारने केला आणि हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जाहीर केले. मनोज जरांगे यांचे आंदोलन वेळीच थांबवता आले असते, पण सरकारचे ‘इंटरेस्ट’ वेगळ्या पद्धतीचे होते. सरकारला मराठा विरुद्ध ओबीसी असा बखेडा निर्माण करून राज्यात फूट पाडायची होती. वातावरण पेटवून राजकीय पोळी भाजायची होती आणि तो करेक्ट कार्यक्रम सरकारने केलाच, असा थेट आरोप ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Chandrakant Patil : दुष्काळग्रस्त भागातील विद्यापीठांची फी होणार माफ; विद्यार्थ्यांना दिलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -