लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. अशावेळी आपण सर्वचजण मोदक आवडीने बनवतो. मात्र, मोदकांव्यतिरिक्त दुसरा एखादी गोड मिठाई तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी बालूशाही कशी करायची ते सांगणार आहोत.
साहित्य :
- 1 कप मैदा
- 1/2 चमचा खाण्याचा सोडा
- 2 चमचा तूप
- 3 चमचा दही
- 1/4 साखरेचा 1/2 तारी पाक
- 3/4 कप तूप
- मीठ
कृती :
- साखरेत, साखर भिजेल इतके पाणी घालून ते 1/2 तारी पाक तयार करून ठेवा.
- मैद्यात मीठ, त्यानंतर तूप आणि दही घालून मिक्स करा आणि त्याचा गोळा तयार करा. फक्त एक चमचा पाणी लागले तर घाला. अर्धा तास हा गोळा मुरु द्या.
- कढईत तूप मंद गॅसवर तापायला ठेवा. मुरलेल्या गोळ्यातून पेढ्याचा आकाराच्या बालूशाही करा.
- त्यामध्ये अंगठ्याने दाब द्या आणि हे गरम तुपात अगदी मंद आचेवर तळा.
- कढईत 4-5 बालूशाही सोडल्यावर त्या एका बाजूने तळल्या गेल्या की वर येतात.आता त्याची बाजू पलटा.
- लालसर रंग येईपर्यंत या बालूशाही तळून घ्या आणि तळलेल्या बालूशाही थंड करायला ठेवा.
- या थंड झालेल्या बालूशाही, थंड पाकात किमान 1/2 ते 1 तास ठेवा. त्यानंतर या बालूशाही पाकातून बाहेर काढून ठेवा.
- तयार बालूशाही सर्वांना सर्व्ह करा.
हेही वाचा : Milk Barfi : बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा दूधाची बर्फी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -