Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश नोएडात मोठा अपघात! बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळली; चौघांचा मृत्यू

नोएडात मोठा अपघात! बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळली; चौघांचा मृत्यू

Subscribe

ग्रेटर नोएडा येथे लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. आम्रपाली इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू आहे.

नवी दिल्ली: Greater Noida Lift Accident: काही दिवसांपूर्वी ठाण्यातील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीची लिफ्ट कोसळण्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. या दुर्घटनेत 7 कामगारांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच ग्रेटर नोएडा येथे लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे. आम्रपाली इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Big accident in Noida An elevator collapsed during construction Four died Amrapali building )

गौर सिटी एक मूर्तीजवळ इमारतीचं काम सुरू होतं. काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. दुर्घटना घडली त्यावेळी लिफ्टमध्ये बांधकामासाठीचे साहित्य आणि कामगार होते. मृत कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सर्व मृत कामगार हे बिहारच्या किशनपूरच्या टभका गावात राहणारे होते.

ठाण्यातही घडला होता असा प्रकार

- Advertisement -

ठाण्यात बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. नुकतंच बांधकाम पूर्ण झालेल्या 40 मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून लिफ्टने सहा कामगारांसह एक लिफ्ट ऑपरेटर खाली येत होते. यावेळी लिफ्ट खालील भाग पूर्णपणे निखळा. त्यातून सर्व कामगार खाली कोसळून त्यांच्यावर लिफ्टचा लोखंडी सांगाडा कोसळला.

(हेही वाचा: Aditya-L1 Mission : ‘आदित्य’ने चौथ्यांदा बदलली कक्षा; सूर्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -