मजबूत पाठीसाठी करा ही योगासनं!

मजबूत पाठीसाठी करा ही योगासनं!

योगा

सतत बसून राहिल्यामुळे किंवा कामामुळे पाठीचे दुखणे वाढते. मणक्याचे तसेच पाठीचे दुखणे कमी होण्यासाठी ती मजबूत असणे गरजेचे आहे. त्याकरिता योगाभ्यास नक्कीच फायदेशीर ठरतो. योगा एक्सपर्ट यांनी सुचवलेली ही काही योगासनं नक्कीच पाठीचे आरोग्य जपण्यास फायदेशीर ठरेल.

धनुरासन –

या आसनामुळे पाठीचे स्नायू बळकट होतात. तसेच पोटाजवळचा, छातीजवळचा भाग मजबूत होण्यास मदत होते.

सर्वांगासन –

या आसनामुळे पाठीच्या वरच्या भागाला मजबुती मिळण्यास मदत होते. तसेच हिप्स, पाय आणि पार्श्वभागावरील स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

शलभासन –

या आसनामुळे पाठीच्या कण्याजवळील स्नायूंवर, पायांजवळील स्नायूंजवळ ताण येऊन तेथील स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

उष्ट्रासन –

या आसनामुळे हिप्सजवळील भागाला स्ट्रेचिंग होते. तसेच यामुळे तुमचे पोश्चर सुधारायला मदत होते.

वीरभद्रासन –

या आसनामुळे पायांच्या स्नायूंवर ताण येतो. तसेच पाठीच्या कण्याचे पोश्चर सुधारते. प्रामुख्याने पाठीच्या खालच्या भागाकडील स्नायूंना बळकटी मिळते.

First Published on: October 25, 2018 12:34 AM
Exit mobile version