Saturday, May 4, 2024
घरमानिनीKitchenMango shrikhand : 15-20 मिनिटात झटपट बनवा आंब्याचे श्रीखंड

Mango shrikhand : 15-20 मिनिटात झटपट बनवा आंब्याचे श्रीखंड

Subscribe

सध्या बाजारात आंब्याचा सीझन जोरदार सुरु आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आंबा सर्वांचे आवडीचे फळ आहे. अनेकदा आंब्यापासून आपण आमरस, मँगो मिल्क शेक बनवतो. आज आम्ही तुम्हाला आंब्याचे श्रीखंड कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य :

Love Mangoes? Here Are 5 Foods You Should Avoid Having With Them - NDTV Food

- Advertisement -
  • 2 कप घट्ट दही
  • 2 पिकलेले आंबे
  • 1/2 कप साखर
  • 1/2 चमचे वेलची पूड
  • 4-5 काजू (बारीक चिरलेले)

कृती :

Mango Shrikhand Recipe - Fun FOOD Frolic

  • सर्वप्रथम आंबे धुवून सोलून बारीक चिरून घ्या. नंतर आंब्याचे तुकडे ब्लेंडरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा.
  • आता 2 कप दही मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन चांगले फेटून घ्या.
  • आता त्यात आंब्याची पेस्ट घाला.
  • यानंतर चवीनुसार साखर आणि वेलची पूड घालून चांगले मिक्स करा.
  • आता या श्रीखंडात काजू टाकून चांगले मिसळा.
  • आता फ्रीजमध्ये गार होण्यासाठी 1-2 तास ठेवा.
  • त्यानंतर हे तयार आंब्याचे श्रीखंड पुरीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा : 

- Advertisment -

Manini