Wednesday, May 15, 2024
घरमानिनीBeautyमेनीक्योरसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रायरमुळे DNA चे होते नुकसान

मेनीक्योरसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रायरमुळे DNA चे होते नुकसान

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून जेल मेनीक्योरचा ट्रेंन्ड वाढला गेला आहे. याच कारणास्तव नेलपॉलिश लवकर सुकली जाते. एक्ट्रा ग्लॉसी आणि दीर्घकाळ नखांवर नेलपॉलिश टिकून रहावी म्हणून याचा वापर केला जातो. परंतु हे आरोग्यासंबंधित जोखिम वाढवू शकते. एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, युवी नेल ड्रायर व्यक्तीच्या डीएनएला नुकसान पोहटवतात. हे व्यक्तीच्या सेलमध्ये परिवर्तन करू शकतात.

एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, नेल ड्रायरमध्ये अल्ट्रा वायलेट रेजचा वापर हा जेल कठोर करण्यासाठी केला जातो. हे सेलुलर आणि जेनेटिक सामग्रीला नुकसान पोहचवू शकते. विशेष रुपात मानव कोशिकांमध्ये हे स्थायी परिवर्तन करतात. यामुळे कॅन्सरचा धोका वाढला जातो. काही शोध आणि अभ्यासातून असे समोर आले आहे की, युवी किरणांमुळे त्वचेला नुकसान पोहचले जाते. त्यामुले स्किन कॅन्सरचा धोका वाढला जातो. स्किन कॅन्सर आणि अप्रत्यक्ष डीएनए डॅमेजसोबत याचा थेट संबंध आहे.

- Advertisement -

New study finds UV nail lamps can damage DNA and cause mutations | MiNDFOOD

युवी नेल लॅम्पमध्ये काही बल्ब असतात. जे 340-395 एनएमच्या दरम्यान युवी वेव लेंथ उत्सर्जित करतात. हे वेव नेल पॉलिश फॉर्म्युलाला ठिक करण्यासह सुकण्यास मदत करते. त्याला जेलच्या रुपात ओळखले जाते.

- Advertisement -

केमिकल प्रक्रियेच्या कारणास्तव युवी रेजच्या संपर्कात आल्यास जेल पॉलिमर ऑलिगोमर्समध्ये बदलतात. याच कारणास्तव नेल पॉलिश हार्ड होते आणि दीर्घकाळ टिकून राहते. सर्वसामान्यपणे एका सेशनमध्ये नखं आणि हात दोन्ही 10 मिनिटांपर्यंत युवी नेल ड्रायरने एक्सपोज केले जाते. नियमित याचा वापर करणारी लोक आठवड्यातून दोनवेळेस जेल मेनीक्योर बदलतात.


हेही वाचा- नेल आर्ट करण्यासाठी खास टीप्स

- Advertisment -

Manini