Thursday, May 9, 2024
घरमानिनीBeautyनेल आर्ट करण्यासाठी खास टीप्स

नेल आर्ट करण्यासाठी खास टीप्स

Subscribe

आपले हात आणि नखं आपले सौंदर्य खुलून दिसण्यास मदत करतात. नखांना नेलपेंट लावल्याने नखं सुंदर दिसतात. सध्या नखांवर नेल आर्ट ही केले जाते. यावेळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डिझाइन तुमच्या नखांवर उतरवू शकता. अथवा तुमच्या एखाद्या ड्रेस किंवा साडीला शोभेल असे ही नेल आर्ट आता पार्लरमध्ये करून दिले जाते. मात्र नेल आर्ट करण्याासाठीच्या पुढील काही खास टीप्स जरुर पहा.

21 Easy Nail Art Ideas For 2021 - L'Oréal Paris

- Advertisement -

-नेल आर्टसाठी सर्वात प्रथम नखांची स्वच्छता, त्याचा आकार आणि त्याच्या कंडीशनिंगवर लक्ष द्यावे. यासाठी नखांना लिंबू आणि सोड्याच्या पाण्यात थोडावेळ बुडवून ठेवावे. असे केल्यानंतर थोड्यावेळाने हात पुसून घ्यावेत.

-आता नखांना फाइलरच्या मदतीने तुम्हाला आवडेल तो शेप द्या. जेणेकरुन नख व्यवस्थितीत दिसतील.

- Advertisement -

-नखांवर नेल प्राइमवर लावल्यानंतर बेस कोट लावा. असे करणे नखांसाठी सुरक्षित मानले जाते. त्यावर पिवळसर डाग येत नाहीत. बेस कोट लावल्यानंतर तो सुकल्यावर पुन्हा दुसरा कोट लावा. तो सुकल्याने अन्य मॅचिंग नेल कलरने आवडीची डिझाइन करू शकता.

13 rainbow nail art ideas to try during Pride month and beyond - Good  Morning America

-घरी असलेल्या बारीक ब्रशच्या मदतीने डिझाइन करू शकता. अन्यथा बाजारात नेल आर्टसाठी काही टुल्स येतात. त्याचा वापर तुम्ही करू शकता.

-अतिरिक्त डेकोरेशनसाठी तुम्ही कलरफुल स्टोन, ग्लिटरचा वापर करू शकता. डिझाइन पूर्ण झाल्यानंतर ती सुकू द्या आणि अखेर शाइनरचा वापर करा. जेणेकरुन नखांना नैसर्गिक चमक येईल.


हेही वाचा- नखांवरील मेहंदी अशा पद्धतीने हटवा

- Advertisment -

Manini