Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthकडू मेथीचे अगणित फायदे

कडू मेथीचे अगणित फायदे

Subscribe

चवीला कडू असणारी मेथी शरीरासाठी आरोग्यदायी असते. मेथीच्या भाजीप्रमाणेच तिचे दाणेही गुणकारी आहेत. भारतात जवळपास सर्वच ठिकाणी मसाल्यांमध्ये मेथीच्या दाण्याचा वापर केला जातो. मेथीमध्ये आढळणारा अल्कलॉईड इन्सुलिनला नियंत्रणात ठेवतो. ज्यामुळे शुगर लेवल कमी होते. त्यासाठी मेथीचा काढा नियमित घ्यावा. मधुमेहासोबतच मेथी इतर आजारांवर देखील फायदेशीर आहे.

Methi (Fenugreek) For Hair: Benefits & Home Remedies - The Wellness Corner

- Advertisement -

 

  • केस गळती थांबवण्यासाठी

मेथीचे दाणे रात्रभर गरम खोबरेल तेलात भिजवून ठेवा. सकाळी उठून या तेलाने डोक्याला मसाज केल्याने केस गळणे हळूहळू बंद होईल.

- Advertisement -
  • केसातील कोंडा दूरण्यासाठी

मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. कोंडा दूर होईल.अपचन, बद्धकोष्ठता झाल्यास अर्धा चमचा मेथीचे दाणे पाण्यासोबत घ्यावे. सकाळ, संध्याकाळ मेथीचे दाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.

Fenugreek Seeds for Hair: Benefits, Side Effects & More

  • उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी

अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्या. हे दाणे रात्रभर गरम पाण्यात भिजवा. सकाळी उठून हे पाणी पिऊन घ्या आणि मेथीचे दाणे चावून खा. असे केल्याने उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल.

  • भाजल्याचे व्रण दूर करण्यासाठी

मेथीच्या दाण्याची पावडर तयार करून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट लावल्याने शरीरावरील भाजल्याचे व्रण दूर होतात.

  • वजन कमी करण्यासाठी

महिलांनी नियमित 3 ग्रॅम मेथीच्या दाण्यांचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊन हार्मोन्सही संतुलित राहतात.


हेही वाचा :

लाल सिमला मिरचीचे सेवन केल्यास होतात ‘हे’ फायदे

- Advertisment -

Manini