नाश्ता: मसाला पाव

नाश्ता: मसाला पाव

नाश्ता: मसाला पाव

बऱ्याचदा नाश्ता काय करावा, असा सर्वच गृहिणींना प्रश्न पडतो. त्यात तो नाश्ता पौष्टिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खमंग आणि चविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहोत.

साहित्य

दोन चमचा बटर
दोन चमचे लसूण पेस्ट
१ बारीक चिरलेला कांदा
१ बारीक चिरलेली शिमला मिरची
४ बारीक चिरलेले टोमॅटो
२ चमचे पावभाजी मसाला
२ चमचे लाल तिखट
चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम एका पॅनमध्ये दोन चमचा बटर घालून त्यामध्ये लसूण पेस्ट, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, पावभाजी मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करुन घ्या. त्यानंतर पाव तयार करण्यासाठी पावाला बटर लावून ती भाजी पावामध्ये आणि पावावर चांगली लावून पाव पुन्हा एकदा परतून घ्या, अशाप्रकारे मसाला पाव तयार.

 

First Published on: September 25, 2020 6:56 AM
Exit mobile version