खमंग मेथी मटर मलाई

खमंग मेथी मटर मलाई

खमंग मेथी मटर मलाई

दररोज त्याच त्याच भाज्या खाऊन फार कंटाळा येतो. काहीतरी खमंग असे खावेसे वाटते. चला तर आज मी तुम्हाला खमंग मेथी मटर मलाई कशी बनवायची ते सांगणार आहे.

साहित्य

२०० ग्रॅम निवडलेली मेथी
१५० ग्रॅम मटार (वाफवलेले)
१ मोठा कांदा बारीक चिरून
१ चमचा आलं
१ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा अर्धा कप फेटलेले दही किंवा टोमॅटो प्युरी
१ चमचा तेल
१ चमचा जिरेपूड
१ चमचा धणेपूड
१ चमचा गरम मसाला
अर्धा कप क्रीम
२ चमचे लोणी
दीड चमचा तिखट
मीठ

कृती

तेल गरम करून कांदा गुलाबी करुन घ्यावा. त्यानंतर त्यात आलं, लसूण पेस्ट, मेथी चिरून घालून हे साहित्य चांगले परतवून घ्या. त्यानंतर तिखट, धनेपूड, जिरेपूड, मीठ, टोमॅटो प्युरी, वाफवलेला मटार घालून पुन्हा परता. त्यानंतर क्रीम घालून परता आणि वर लोणी घालून गॅस बंद करा. या भाजीला मेथीमुळे सुंदर असा हिरवा रंग येतो आणि चवीला खमंगही लागते.

First Published on: February 13, 2020 6:40 AM
Exit mobile version