Friday, May 17, 2024
घरमानिनीRecipeपावसाळ्यात 'हे' पदार्थ खाऊ नका

पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाऊ नका

Subscribe

उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरु झाल्यानंतर सर्वांना आनंद होततो. मात्र पावसाळात आपण खुप वेळा भिजतो आणि आजारी ही पडतो. अशातच या ऋतूत आपल्याला पचनासंबंधित समस्या, एलर्जी आणि काही आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे काही इंन्फेक्शन्स होतात. जर तुम्हाला सुद्धा अशा समस्यांपासून दूर रहायचे असेल तर तुमच्या डाएटकडे लक्ष द्या. तर पाहूयात पावसाळ्यात कोणत्या गोष्टी खाण्यापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. (Eating tips in monsoon)

पालेभाज्या

- Advertisement -


हेल्दी राहण्यासाठी पालेभाज्या फायदेशीर असतात. परंतु तुम्ही पावसाळ्यात त्याचे सेवन करु नये. कारण यामध्ये पावसाळ्यात अधिक ओलावा असतो. अशातच बॅक्टेरिया हे खासकरुन हिरव्या पालेभाज्यांत वाढले जातात. ज्या भाज्या मातीतून काढल्या जातात त्यांच्या माध्यमातून हानिकारक सुक्ष्मजीव या भाज्यांपर्यंत पोहचतात. त्यामुळे हिरव्या भाज्या जरी तुम्हाला खायच्या असतील तर त्या स्वच्छ धुवा आणि नंतर व्यवस्थितीत शिजवून खा.

सी-फूड

- Advertisement -


रिसर्चनुसार, पावसाळ्यात मासे खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. खरंतर हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असते. अशातच बाजारात विक्री केल्या जाणारे सी-फूड हे फ्रेश नसते. पावसाळ्यात तुम्हाला फ्रोजन सी-फूड्स मिळतील. पण त्याचे सुद्धा सेवन करणे धोकादायक ठरु शकते.

मसालेदार आणि तळलेले पदार्थ


कोणत्याही ऋतूत मसालेदार पदार्थांचे अधिक सेवन आरोग्य बिघडवते. त्यामुळे तुम्हाला पोटासंबंधित विकार होऊ शकतात. जसे की, अचपनच.

कच्चे खाद्यपदार्थ


कच्चे खाद्यपदार्थ तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. पावसाळ्यात जर तुम्ही कच्चे पदार्थ खाण्याचा विचार करत असाल तर याच्या माध्यमातून संक्रमण होण्याची शक्यता असते.


हेही वाचा- Immunity वाढण्यासाठी घ्या ‘हा’ चहा

- Advertisment -

Manini