Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthबनाना डाएटने करा वजन कमी

बनाना डाएटने करा वजन कमी

Subscribe

हेल्थ उत्तम राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी लोक विविध प्रकारचे डाएट फॉलो करतात. काही लोकांना आपल्या पोटावरील चरबी कमी करायची असते म्हणून लिक्विड डाएटचे सेवन करतात. तर काही लोक कमीत कमी फूड खात सलाडच्या माध्यमातून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. वेळोवेळी वेट लॉसचे नवे ट्रेंन्ड हे चर्चेत येतात.

सध्या जगभरात वजन कमी करण्यासाठी विविध डाएटची मदत घेतली जाते. त्यापैकीच एक म्हणजे ‘मॉर्निंग बनाना डाएट’. ही डाएटची पद्धत जापान मध्ये सुरु झाली असून काही देशांमध्ये लोकप्रिय होत आहे. असे म्हटले जाते की, वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. काही देशांमध्ये डाएटची ही पद्धत लोकप्रिय होत आहे.

- Advertisement -

Banana Diet: Meal Plan, Rules & How to Lose Weight - Tua Saúde

रिपोर्ट्सनुसार मॉर्निंग बनाना डाएटमध्ये लोक आपल्या दिवसाची सुरुवात केळ खाऊन करतात. ब्रेकफास्टमध्ये लोक 3-4 केळी खातात. जर तुमचे पोट भरले नाही तर अधिक केळी खाऊ शकतात. केळ खाण्यासह लोकांना रुम टेपरेचरवर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त या डाएटला फॉलो करणारी लोक बॅलेन्स्ड लंच किंवा डिनर करतात.

- Advertisement -

या डाएटमध्ये लंच आणि डिनरमध्ये लोक आपल्या आवडची खातात. मात्र जेव्हा पोट 80 टक्के भरले जाते त्यानंतर काहीच खात नाहीत. रात्रीच्या वेळी लवकर जेवण्याचा सल्ला दिला जातो. त्याचसोबत या डाएटमध्ये गोड पदार्थ खाण्यासही परवानगी नसते.

मॉर्निंग बनाना डाएटमध्ये लोकांना पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरुन शरीराला पुरेसा आराम मिळेल. या डाएटमध्ये लोक दिवसभर खुप पाणी पितात. परंतु या डाएटमुळे वजन कमी कसे करतात येईल याबद्दल हेल्थ एक्सपर्ट्स काय म्हणतात हे पाहूयात.एक्सपर्ट्सच्या मते, सकाळी नाश्तात केळ खाल्ल्याने शरीराला गरजेचे प्रोटीन आणि अन्य पोषक तत्त्वे मिळतात. वजन कमी करण्याच्या विविध पद्धती असू शकतात. परंतु डाएटमध्ये तुम्ही नेहमीच हेल्दी फूड्स खाल्ले पाहिजे.


हेही वाचा- हिरव्या मिरचीत आहेत कॅन्सर पासून बचाव करणारे गुण

- Advertisment -

Manini