घररायगडकोंझर गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी उजळवली शाळा

कोंझर गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी उजळवली शाळा

Subscribe

२७ वर्षांनी जुन्या आठवणींना उजाळा

महाड-; 
तालुक्यातील कोंझर गावात असलेल्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९५ च्या एस.एस.सी बॅचमधील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेह मेळावा अनोख्या पध्दतीने साजरा केला.ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले त्या शाळेच्या चार वर्गांचे विद्युत रोषणाईचे काम माजी विद्यार्थ्यांनी पुर्ण केले आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे शिक्षकांनी कौतुक केले. 

२७ वर्षांनी पुन्हा एकत्रित आलेल्या शालेय मित्रांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत अविस्मरणीय क्षणाचा आनंद घेतला.विविध क्षेत्रात काम करणार्‍या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने शाळेसाठी काही तरी केले पाहिजे या हेतूने आर्थिक निधीची तयारी सुरु केली. आणि शाळेचे वर्ग रोषणाईने उजळवल्याची कल्पना पुर्णत्वास नेली.

- Advertisement -

हेही वाचा –मराठा आरक्षणाला असाही पाठिंबा; मंत्रालयाबाहेर तीन आमदारांकडून उपोषण

यावेळी मुख्याध्यापक नामदेव डिगे यांनी सर्वांचे स्वागत केले. ज्या शाळेतून तुम्ही शिकलात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना तुम्ही शाळेला विसरला नाहीत ही बाब कौतुकास्पद आहे, असे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुमचा नक्कीच अभिमान वाटेल, असे गौरवोद्गारही मुख्याध्यापक डिगे यांनी काढले.

- Advertisement -

माजी विद्यार्थी पत्रकार निलेश पवार, संतोष शेडगे, संदीप आमगावकर, सिराज सय्यद यांनी मनोगत मांडले.यावेळी मोटे डी.एम, मोटे आर.ए, विन्हेरकर के.सी, साळवी एन.आर, जंगम ए.वी, डावले डी.बी., मोरे एस.एन, सावंत एन. बी, वडके पी.पी, लेखनिक पेके डी.एच, शिपाई आरती पवार, विद्यार्थी ओमकार आखाडे, प्रज्योत शेडगे आदी उपस्थित होते. शाळेतील विद्युत यंत्रणेचे काम बाळकृष्ण जाधव, वायरमन सांदोशी यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -