Mothers Day: आईला खुश करण्यासाठी असा साजरा करा मदर्स डे

Mothers Day: आईला खुश करण्यासाठी असा साजरा करा मदर्स डे

आईला देवाचे रुप मानले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचे एक वेगळेच महत्व असते. सुख असो किंवा दु:ख तेव्हा पहिला व्यक्ती आईच आठवते. आईचे आभार मानणे आणि प्रेम जाहिर करण्याच्या उद्देशानेच प्रत्येक वर्षी मे महिन्यात मदर्स डे साजरा केला जातो. हा खास दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा १४ मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे.

मदर्स डे विविध प्रकारे साजरा करतात. एखादा आपल्या आईला खास मेसेज पाठवतो तर दुसरा तिला सरप्राइज, गिफ्ट देऊन खुश करण्याचा प्रयत्न करतो. अशातच जर तुम्हाला सुद्धा यंदाच्या मदर्स डे निमित्त आईला खुश करायचे असेल तर पुढील काही टीप्स तुमच्या कामी येऊ शकतात.

-फिरायला घेऊन जा
मदर्स डे च्या दिवशी रविवार आल्याने तुम्ही तुमच्या आईला एखाद्या ठिकाणी फिरायला घेऊन जा. यानिमित्त आई आणि तुमच्या घरातील अन्य मंडळींसोबत पिकनिकला जा.

-आईसाठी बनवा स्पेशल डिश
आईच्या हातचे पदार्थ दररोज तुम्ही खाता. पण मदर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या हाताने तिच्यासाठी खास स्पेशल डिश बनवा. अथवा तुम्ही तुमच्या आईसोबत डिनरसाठी सुद्धा जाऊ शकता.

-मुव्ही प्लॅन करा
रविवार असल्याने तुम्ही मदर्स डे खास साजरा करण्यासाठी तुम्ही आईसोबत मुव्ही प्लॅन करु शकता. अथवा घरीच तिच्या आवडीचा एखादा सिनेमा एकत्रित पाहू शकता.

-फोटो फ्रेम
मदर्स डे निमित्त आईला खास सप्राइज द्यायचे असेल तर तिला फोटो फ्रेम द्या. यामध्ये तुमचे आणि आईचे काही खास फोटो सुद्धा त्यात असू द्या.

-हाताने बनवलेले एखादे गिफ्ट
जर मदर्स डे निमित्त आईला एखादे युनिक गिफ्ट द्यायचे असेल तर बाजारातून काही खरेदी करण्याऐवजी घरच्या घरीच एखादे गिफ्ट तयार करा. जसे की, ग्रिटिंग कार्ड.


हेही वाचा- नोकरी करणाऱ्या couples साठी ‘या’ आहेत Parenting Tips

First Published on: May 9, 2023 2:30 PM
Exit mobile version