Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthसकाळी उठल्यानंतर मान दुखते तर 'या' उपायांनी मिळेल आराम

सकाळी उठल्यानंतर मान दुखते तर ‘या’ उपायांनी मिळेल आराम

Subscribe

ऑफिस मध्ये लॅपटॉपच्या समोर खुप तास बसून राहिल्याने किंवा वर्क फ्रॉम होमच्या सिस्टिम समोर एकाच पोस्चरमध्ये बसून राहिल्याने पाठ आणि मान दुखण्याची समस्या निर्माण होते. अशातच काही वेळेस बहुतांश लोकांना सकाळी उठल्यानंतर मानेच्या येथे दुखण्यास सुरुवात होते किंवा मान जडं झाल्यासारखी वाटते. त्यामुळे ती लगेच वळवता सुद्धा येत नाही.

या व्यतिरिक्त काहींना मानेच्या दुखण्यामुळे चक्कर येत असल्यासारखे ही वाटते. अशातच दिवसभर काम करताना समस्या येते. यामागील कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने झोपणे किंवा उशीचा योग्य पद्धतीने वापर न करणे. तुम्हाला सुद्धा सकाळी उठल्यानंतर असा त्रास होत असेल तर तो कसा दूर कराल याच बद्दलच्या काही टीप्स आपण पाहणार आहोत.

- Advertisement -

-जर तुमची मान दुखत असेल तर अशातच तुम्ही आइस पॅक किंवा थंड पाण्यात रुमाल बुडून त्याने शेकवा. असे केल्याने मानेच्या स्नायूंना आराम मिळेल.
-या व्यतिरिक्त हिट पॅकचा वापर करु शकता. मात्र जर मान खुपच दुखत असेल तर स्वत:हून कोणत्याही गोळ्या घेऊ नका.
-हलक्या हाताने मसाज करा. जेणेकरुन मानेच्या येथे आराम मिळेल. मसाज करण्यासाठी तुम्ही राईचे तेल किंवा नारळाचे तेल वापरु शकता. या व्यतिरिक्त तिळाचे तेल सुद्धा वापरु शकता.
-मानेच्या दुखीपासून दूर राहण्याासाठी पोटाच्या जोरावर झोपण्यापासून दूर रहा.
-जर मानेचे दुखणे अधिक वाढले असेल तर डॉक्टरांना भेटा. असे असू शकते की, तुमच्या चुकीच्या झोपेच्या कारणास्तव मानेच्या नसवर दबाव पडत असेल.

- Advertisement -

हेही वाचा- कानदुखीवर करा ‘हे’ घरगुती उपाय

- Advertisment -

Manini