Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthकानदुखीवर करा 'हे' घरगुती उपाय

कानदुखीवर करा ‘हे’ घरगुती उपाय

Subscribe

कान दुखण्याची समस्या होत असेल तर खुप त्रास होतो. कानदुखीची काही कारणं असू शकतात. जसे की, कानात इंफेक्शन, कानात घाण जमा होणे, बदलता ऋतू. काही वेळेस कानात पाणी गेल्याने सुद्धा कानदुखीची सुद्धा समस्या उद्भवते. अशातच कानातदुखी सुरु झाल्यानंतर आपण काही इयर ड्रॉप्स किंवा औषधांचा वापर करतो. मात्र या दुखण्यापासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय ही केले जातात. एक गोष्ट लक्षात ठेवा जर कानदुखी सामान्य असेल तरच घरगुती उपाय करा. मात्र अधिक कानदुखी असेल तज्ञांचा सल्ला घ्या. (Ear pain home remedies)

कानदुखीवर घरगुती उपाय
-ऑलिव्ह ऑइल

- Advertisement -


ऑलिव्ह ऑइल हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानले जाते. त्याचसोबत तुम्हाला कानदुखीच्या समस्येपासून दूर राहण्यास ही मदत करेल. जर कानदुखत असेल तर ऑलिव ऑइल हलके गरम करा आणि 2-3 थेंब त्यामध्ये टाका. त्यानंतर कॉटन बडच्या मदतीने तेल कानात अप्लाय करू शकता.

-टी ट्री ऑइल

- Advertisement -


कान जर एखाद्या कारणास्तव दुखत असेल तर टी ट्री ऑइलचा वापर करू शकता. यासाठी टी ट्री ऑइलचे दोन-तीन थेंब तिळाच्या तेलात मिक्स करुन ते हलके गरम करुन घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाचे थेंब कानात टाका.

-लसूण


लसूण काही आजारांवर फायदेशीर आहे. यामध्ये अँन्टीबॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे संक्रमण दूर होते. कानदुखीच्या समस्येपासून दूर रहायचे असेल तर कच्च्या लसूणच्या पाकळ्या तेलात टाकून त्या गरम करा. जेव्हा लसूण पूर्णपणे तेलात जळले जाईल तेव्हा गॅस बंद करा. आता ते तेल गाळून थंड झाल्यानंतर त्याचे दोन-तीन थेंब कानात टाका.

-आलं


आल्याचा वापर करुन कानदुखीपासून दूर राहू शकता. आल्यात अँन्टीबॅक्टेरियल आणि अँन्टी इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे कानदुखी आणि संक्रमण दूर करण्यास मदत करतात. यासाठी आलं किसून त्यात मोहरीचे तेल टाका आणि गरम करा. तेल गाळून थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर दोन-तीन थेंब कानात टाका.

-कांद्याचा रस


जर इंन्फेक्शनमुळे कान दुखत असेल तर कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. कानदुखीपासू दूर रहायचे असेल तर कांद्याचा रस हा रामबाण उपाय आहे.


हेही वाचा- आजीच्या बटव्यातील हे आहेत सात आजारांवरील सात उपचार

- Advertisment -

Manini