पीरियड्स बंद झाल्यानंतर ‘या’ चुका करणे टाळा

पीरियड्स बंद झाल्यानंतर ‘या’ चुका करणे टाळा

महिलांचे जसे-जसे वय वाढते तसा त्यांच्या आरोग्यावर ही काही गोष्टींचा परिणाम दिसून येतो. वाढत्या वयानुसार महिलांना काही आजारांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये काही गंभीर आजारांचा सुद्धा समावेश असू शकतो. सर्वात मोठी समस्या महिलांमध्ये तेव्हा होते जेव्हा त्यांची पीरियड सायकल म्हणजेच पोस्ट-मेनोपॉजची प्रक्रिया बंद होते.

पीरियड्स साधारणपणे 45-50 वयादरम्यान बंद होण्यास सुरुवात होते. त्यानंतर महिलांच्या शरिरात काही प्रकारचे बदल दिसून येतात. पीरियड्स बंद झाल्यानंतर महिलांमध्ये हृदयासंबंधित आजार होऊ शकतात. म्हणजेच पीरियड्स बंद होणे महिलांमध्ये शारिरीक आणि मानसिक रोगांचे कारण बनू शकते. अशातच महिलांनी काही चुका करणे टाळल्या पाहिजेत.

पीरियड्स बंद झाल्यानंतर महिलांमध्ये काही आजार होऊ शकतात. हैराण करणारी गोष्ट अशी की, त्यांना काही वेळेस या आजारांबद्दल माहितीच नसते आणि त्या त्याच्या शिकार होतात. डॉक्टर्स असे मानतात की, अशावेळी महिलांमध्ये हृदयासंबंधित आजार, शुगरची समस्या, अस्थमा, ऑस्टियोपोरोसिस, ब्रेस्ट कँन्सर सारख्या गंभीर समस्या दिसून येऊ शकतात.

असा ठेवा डाएट
जेव्हा महिलांना पीरियड्स येणे बंद होते तेव्हा सर्वात प्रथम नियमित योगा किंवा एखाद्या प्रकारची एक्सरसाइज करावी. त्याचसोबत डाएटकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावे. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये लोह आणि कॅल्शिअम युक्त फूड्सचा समावेश करावा. यामुळे आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल. हाडांच्या रोगांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही कॅल्शिअम, व्हिटॅमिनयुक्त फूड्स सुद्धा डाएटमध्ये खा.


हेही वाचा- ब्लोटिंगच्या समस्येवर किचनमधील ‘हे’ पदार्थ ठरतील रामबाण उपाय

First Published on: August 25, 2023 1:23 PM
Exit mobile version