Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthब्लोटिंगच्या समस्येवर किचनमधील 'हे' पदार्थ ठरतील रामबाण उपाय

ब्लोटिंगच्या समस्येवर किचनमधील ‘हे’ पदार्थ ठरतील रामबाण उपाय

Subscribe

अधिक फूड्स खाल्ल्याने किंवा असंतुलित आहारामुळे आपल्याला ब्लोटिंगच्या समस्येचा सामना करावा लागतो. याच कारणास्तव भीती वाटणे, बैचेन वाटणे, छातीत जळजळ अशा समस्या वाढू लागतात. यामध्ये पोट फुगणे ही सुद्धा समस्या जाणवते. सर्वसामान्यपणे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, डिहाइड्रेटेड आणि पीरियड्स सुद्धा महिलांमध्ये ब्लोटिंगचे एक कारण ठरते. (Bloating problem)

केळं

- Advertisement -


फायबर आणि पोटॅशिअमचा उत्तम स्रोत असलेले केळं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. केळं आपल्या शरिरात सोडियमचा स्तर रेग्युलेट करतात. त्याचसोबत वॉटर रिटेंशनचा धोका सुद्धा दूर होण्यास मदत होते. नॅशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसिनच्या मते ज्या महिला दिवसभरात दोनवेळेस केळं खातात त्या ब्लोटिंगच्या समस्येपासून दूर राहतात. केळं आपल्या गट हेल्थची सुद्धा काळजी घेते.

टोमॅटो

- Advertisement -

Substitutes-for-Tomatoes
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात प्रीबायोटिक्स असतात. जे हेल्दी गट बॅक्टेरियाला शरिरात वाढण्यास मदत करतात. याच्या सेवनाने आपले शरिर काही प्रकारच्या आजारापासून दूर राहते. यामध्ये असलेल्या डिटॉक्सीफाइंग प्रॉपर्टीज डाइजेस्टिव्ह सिस्टिमला उत्तम बनवतात. व्हिटॅमिन सी युक्त टोमॅटोचा ज्यूस, चटणी किंवा प्युरी तुम्ही तुमच्या खाण्यात अॅड करू शकता.

आलं

ginger
आलं

आलं आपल्याला काही आजारांपासून दूर ठेवतो. अॅसिडिटी संबंधित समस्या सुद्धा दूर राहण्यासाठी आलं पाण्यात उकळवून त्याचे पाणी प्यायल्याने ब्लोटिंगची समस्या दूर होते. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, दररोज १५०० मिलिग्रॅम आलं खाल्ल्याने ब्लोटिंग व्यतिरिक्त बैचेन वाटणे यासारखी समस्या ही दूर होते.

दही

eating curd
eating curd

दह्याचे सेवन केल्याने ब्लोटिंगची समस्या दूर राहते. त्याचसोबत तुमची पचनक्रिया ही सुरळीत होते. यामध्ये असलेले हेल्दी बॅक्टेरिया पोटासंबंधित समस्या दूर होते. दह्यात एक चिमुटभर मीठ आणि काळी मिरी मिक्स करून खाल्ल्यास पोटात जमा असलेल्या अॅसिडिटीची समस्या दूर होते.

ओवा


ओव्यात कॅल्शिअम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. चिमुटभर ओवा मीठासोबत मिक्स करुन खाल्ल्यास पोटासंबंधित अॅसिडिटी कमी होते. त्याचसोबत पचनक्रिया मजबूत होते.


हेही वाचा- लवंगाचे अधिक सेवन केल्याने होईल नुकसान

- Advertisment -

Manini