नवजात बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

नवजात बाळाला आंघोळ घालण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

नवजात बाळाला पहिल्यांदा आंघोळ घालणे पालकांना मुश्किल होते. कारण यावेळी पहिल्यांदाच आई झालेल्या महिलेला बाळाची काळजी घेताना काही सावधगिरी बाळगावी लागते. अशातच वारंवार सासू, घरातील आजी यांच्या मदतीने बाळाच्या काळजी घेतली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नवजात बाळाला आंघोळ कशी घालावी हे समजून घेतल्याने कोणतीही समस्या उद्भवत नाहीच पण आई-वडिलांसोबतचे त्याचे नाते उत्तम होते. त्यामुळे पालकांनी सुद्धा बाळाला आंघोळ कशी घालतात हे शिकून घेण्याचा सल्ला देतात. (newborn baby bathing tips)

तज्ञ असे म्हणतात की, बाळाच्या त्वचेतील ओलसरपणा लगेच कमी होतो. त्यामुळे त्याची त्वचा कोरडी होऊन त्यावर जळजळ निर्माण होऊ शकते. खरंतर नवजात बाळाची त्वचा वयस्कर लोकांच्या तुलनेत तीन पट अधिक पातळ असण्यासह परिपक्व नसते. यामुळेत त्वचेतील ओलसरपणा लवकर कमी होतो. बाळाचा pH सुद्धा वाढतो. तर बाळाला आंघोळ घालताना कोणती काळजी घ्यावी याच संदर्भातील टीप्स आपण जाणून घेणार आहोत.

-नवजात बाळाला पहिली आंघोळ ही त्याच्या जन्माच्या 6-24 तासानंतर घालावी.
-याआधी रुग्णालयात जन्मल्यानंतर लगेच बाळाला अंघोळ घातली जायची. मात्र आता इंडियन अॅकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांनी असा सल्ला दिल्ला आहे की, बाळाच्या जन्मानंतर जेव्हा बाळ स्थिर होईल तेव्हा त्याला तुम्ही पहिली अंघोळ 6-24 तासादरम्यान घालू शकता.

बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी या सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवा
-जन्मानंतर बाळाला कमीत कमी वेळेत आंघोळ घालावी. पाण्याचे तापमान जरुर पहा.
– आंघोळ घालताना बाळाची नाळ कोमट पाण्याचे स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या. डब्लूएचओने सल्ला दिला आहे की, संक्रमण रोखण्यासाठी कॉड स्टंपवर काही लावू नये.
-बाळाच्या आंघोळीसाठी केवळ 5-10 मिनिटेच घ्यावीत.
-स्पंजच्या तुलनेत टबमध्ये बाळाला आंघोळ घालणे अगदी सुरक्षित आणि आरामदायी ऑप्शन आहे. यामुळे बाळाच्या शरिराला थंडावा मिळेल. बबल बाथ किंवा बाथ एडिटिव्सचा वापर करू नये. कारण यामुळे त्वचेचा pH वाढू शकतो.
-बाळासाठी ग्लिसरीन किंवा नारळाच्या तेलाचा वापर करावा.


हेही वाचा- वर्किंग मॉम आहात, बाळाला ब्रेस्ट फीडींगची चिंता सतावतेय?

 

First Published on: August 21, 2023 12:24 PM
Exit mobile version