Sunday, December 3, 2023
घरमानिनीHealthवर्किंग मॉम आहात, बाळाला ब्रेस्ट फीडींगची चिंता सतावतेय?

वर्किंग मॉम आहात, बाळाला ब्रेस्ट फीडींगची चिंता सतावतेय?

Subscribe

नवजात बाळाला सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध दिले जाते. मात्र सध्या बहुतांश महिला ऑफिसला जाणाऱ्या असतात. तेव्हा त्यांना आपल्या प्रोफेशनसह ब्रेस्टफिडिंग मेंटेन करणे कठीण होऊन जाते. याच कारणास्तव बाळाला पूर्णपणे पोषण मिळत नाही ना त्यांची ग्रोथ योग्य प्रकारे होते. ऐवढेच नव्हे तर नव्या आईसाठी हे स्थिती तणावपूर्ण असते. मात्र तुम्ही चिंता करु नका. कारण ब्रेस्टफिडिंग मेंटेन करण्यासाठी पुढील काही टीप्स तुमच्या कामी येतील. (Working mom breast feeding tips)

ब्रेस्ट पंपचा वापर करा
याच्या मदतीने तुम्ही आपले दूध एका बॉटलमध्ये काढून ठेवा. जेणेकरुन दिवसभर बाळाला त्याच्या भुकेनुसार ते दिले जाऊ शकतात. तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये सुद्धा स्टोर करु शकता. खरंतर दोन प्रकारच्या ब्रेस्ट मिल्क पंपच्या मदतीने तुम्ही दूध स्टोर करु शकता. मॅन्युअल पंपच्या मदतीने तुम्ही स्वत: दूध काढू शकता. तर इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप बॅटरीवर ऑपरेट होते.

- Advertisement -

रात्रीच्या वेळी मुलाला स्वत: फीड करा
दिवसभर बाळ जेव्हा आईपासून दूर राहते तेव्हा ते रडते. अशातच बाळाला शांत करण्यासाठी आणि ब्रेस्ट फिडिंगसाठी रात्रीची वेळ निवडा. यामुळे मुलं त्याला हवे तेवढे दूध पिऊन झोपू शकतो. अशातच बाळाचे स्लीपिंग पॅटर्न सुद्धा आपोआप बदलले जाते.

शक्य असेल तर मेटरनिटी लीव वाढवा
डब्लूएचओनुसा प्रेग्नेंसीमुळे मानसिक आणि फिजिकल स्ट्रेस महिलांमध्ये मिसकॅरेजचे कारण ठरु शकते. भारताव्यतिरिक्त जगातील बहुतांश देशात मेटरनिटी लीव दिली जाते. मेटरनिटी बेनिफिट अॅक्ट 2017 च्या मते भारतातील महिला 26 आठवड्यांपर्यंत मेटरनिटी लीव घेऊ शकतात.

- Advertisement -

रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा
जर तुमचे ऑफिस घराजवळ असेल तुम्हाला अधिक वेळ मुलासोबत घालवण्यास मिळू शकतो. तुम्ही लंच ब्रेकमध्ये घरी जाऊन मुलाला ब्रेस्ट फिड करु शकता. या व्यतिरिक्त तुम्ही बाळाला डे केयर सेंटरमध्ये ठेवू शकता


हेही वाचा- Breast feeding करणाऱ्या मातांनी करावे ‘या’ पदार्थांचे सेवन

- Advertisment -

Manini