चमच्याने नाही; हाताने जेवा आणि आजार दूर करा

चमच्याने नाही; हाताने जेवा आणि आजार दूर करा

आयुर्वेदात म्हटले आहे की, आपण पंचतत्त्वांनी बनलो आहोत. ज्याला जीवन ऊर्जा देखील म्हटले जाते. ही पाच तत्त्वे आपल्या हातात असतात. आपला अंगठा अग्निचे प्रतीक आहे, तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या बाजूचे बोट हवेचे प्रतिक आहे. मध्यमा बोट आकाशाचे प्रतिक, अनामिका बोट पृथ्वीचे आणि सर्वात लहान बोट हे पाण्याचे प्रतिक आहे. यामधील एकाही तत्त्वाचे असंतुलन आजाराचे कारण होऊ शकते.

भारतीय संस्कृतीत हाताने जेवण्याची परंपरा पूर्वीपासून आहे. मात्र, अलीकडच्या बदलत्या काळानुसार अनेकजण हाताने खाण्याऐवजी चमचाने खातात. परंतु, जेव्हा आपण हातानो जेवतो तेव्हा आपण सर्व बोटं एकत्र करून जेवतो. विज्ञानानुसार, ही मुद्रा शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा या सर्व तत्त्वांना एकत्र करतो. यामुळे अन्न अधिक ऊर्जादायक होते.

हाताने जेवण्याचे फायदे

जेव्हा आपण आपल्या हाताने जेवण करतो तेव्हा आपला मेंदू आपल्या पोटाला संदेश देतो. यामुळे आपले पोट जेवण करण्यासाठी तयार होते आणि पचनक्रिया सुधारते.

हाताने जेवण करताना आपल्याला जेवणावर लक्ष द्यावे लागते. यामध्ये आपल्याला जेवणाला पाहावे लागते. याला माइंडफुल ईटिंग म्हटले जाते. हे चमच्याने जेवण करण्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. माइंडफुल ईटिंगचे अनेक फायदे आहेत. यामधील सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे यामुळे जेवणातील पोषकतत्त्व वाढतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आरोग्य चांगले राहते.

आपल्या हाताचे तापमान संवेदकाचे काम करतात. जेव्हा तुम्ही हाताने जेवण करता तेव्हा तुम्हाला कळते की, अन्न किती गरम आहे. जास्त गरम असल्यास आपण ते हळूहळू खातो. परंतु, चमच्याने आपण तसेच खातो यामुळे जीभ भाजण्याची शक्यता असते. हाताने खाल्ल्यावर असे होत नाही.

हाताने जेवल्याने आपल्या हाताचा व्यायाम होतो. तसेच रक्ताभिसरण सुधारते. ही पद्धत विशेषतः स्नायूंच्या लवचिकतेसाठी देखील चांगली आहे.


हेही वाचा :

पावसाळ्यात स्विमिंग करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

First Published on: August 24, 2023 6:48 PM
Exit mobile version