Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenParatha : मुलांच्या टिफीनमध्ये द्या दुधी पराठा

Paratha : मुलांच्या टिफीनमध्ये द्या दुधी पराठा

Subscribe

दुधी भोपळा ही फळभाजी अनेकांना आवडत नाही. पण आरोग्यासाठी सर्व भाज्या खाणं आवश्यक आहे. त्यामुळे आज  आम्ही तुम्हाला दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य :

– Advertisement –

  • 1 वाटी दुधी भोपळ्याचा किस
  • 2 वाटी गव्हाचे पीठ
  • 2 चमचे आलं-लसूण पेस्ट
  • चवीनुसार लाल तिखट
  • एक चमचा हळद
  • एक चमचा गरम मसाला
  • एक चमचा धने पावडर
  • एक चमचा जिरे पावडर
  • चवीनुसार मीठ
  • अर्धी वाटी दही
  • तूप

कृती : 

Dudhi Thepla

– Advertisement –

- Advertisement -

  • एका पसरट पातेल्यात दुधीचा किस घ्यावा. त्यात गव्हाचे पीठ, तिखट, मीठ, हळद, धने-जिरे पावडर, आलं लसून पेस्ट, दही टाकून मळून घ्यावी.
  • पोळपाटावर जाडसर पराठे लाटून घ्यावे.
  • गॅसवर मंद आचेवर तवा गरम करावा, तूप टाकून पराठे खरपूस भाजावेत.
  • सॉस किंवा चटनी किंवा दह्याबरोबर दुधी पराठे सर्व्ह करावे.

हेही वाचा :

Recipe : कांद्याच्या पातीची टेस्टी कोशिंबीर

- Advertisment -

Manini