घरनवी मुंबईमराठी भाषेचे दुकानदारांना अद्याप वावडे?

मराठी भाषेचे दुकानदारांना अद्याप वावडे?

Subscribe

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तिचा यथोचित सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र अद्यापही सानपाडा विभागातील अनेक दुकाने व आस्थापनांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे चित्र आहे. मराठी भाषेचा सन्मान राखला जाणार नसेल तर मनसे स्टाईलने ’खळखट्याक आंदोलन’ करावे लागेल. -योगेश शेटे, मनसे विभाग अध्यक्ष-सानपाडा

नवी मुंबई-मुदत संपली तरीही पाट्या ठळक मराठीत नसलेल्या आस्थापने व दुकाना विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली (Marathi boards MNS aggressive) आहे. या संदर्भात मनसेने पालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून ठळक मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे,शहर सचिव विलास घोणे,सहसचिव दिनेश पाटील,विभाग अध्यक्ष योगेश शेटे, विभाग अध्यक्ष युवराज मनसुख,उपविभाग अध्यक्ष संजय पाटील,शाखा अध्यक्ष संजय कदम आणि अध्यक्ष मंगेश संभेराव यांनी ही मागणी केली आहे.

- Advertisement -

नामफलक मराठीत लिहिण्याचा निर्णय मार्च २०२२ मध्ये विधीमंडळ अधिवेशनात घेण्यात आला होता. त्याआधी २०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाटी बंधनकारक होती. नव्या नियमानुसार कर्मचार्‍यांची संख्या कितीही असली तरी पाटी मराठीतच असणे बंधनकारक आहे.महापालिकेने शहरातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी नामफलक लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांची वाढीव मुदत दिली होती.शनिवार २५ नोव्हेंबर २०२३ रोजी ही मुदत संपली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -