Tuesday, May 14, 2024
घरमानिनीHealthअंडी खाण्यापूर्वी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या,अन्यथा होईल नुकसान

अंडी खाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या,अन्यथा होईल नुकसान

Subscribe

प्रत्येकाला अंडी खाणे आवडते असं नाही. पण बहुतेक लोकांना अंडी खायला आवडतात. तसेच नियमित पण कमी प्रमाणात अंडी खाणे ही एक सवय चांगली आहे. अशातच शरीराच्या सर्व पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी अंड्याचे सेवन करणे फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की एका दिवसात किती अंडी खाण्यासाठी सुरक्षित आहेत. तसेच अंडी किती आणि कधी खावी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर का तुम्ही हवी तशी अंडी खाल्ली तर त्याचा परिणाम तुम्हाला अधिक होऊ शकते.

Are eggs bad for you? Scientists explain if eating eggs every day is healthy

- Advertisement -

1. अंडी खाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा

अंड्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने आणि चरबी असतात. अशक्त आणि कमकुवत लोकांनी हे सुपरफूड जरूर खावे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. पण अंडी खाण्यापूर्वी तुम्ही दिवसभरात किती अंडी खातात हे लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हाला ते सोडावे लागू शकते.

2. एका दिवसात किती अंडी खावीत?

कोणत्याही अन्नाचे रोजचे सेवन हे तुमच्या शारीरिक गरजांवर अवलंबून असते. तथापि, तज्ञांचा असा विश्वास आहे की सामान्य व्यक्ती दिवसभरात 1 ते 2 अंडी आरामात खाऊ शकते.

- Advertisement -

3. जास्त अंडी खाणे हानिकारक आहे

ज्या व्यक्तींचे वय जास्त आहे किंवा जी लोक जास्त वृद्ध आहेत. त्यांनी आठवड्यातून 5-6 पेक्षा जास्त अंडी खावू नयेत. अशातच जर का त्यांनी जास्त अंडी खाली तर त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. मात्र, यामागे अंड्यांशिवाय इतरही अनेक कारणे असू शकतात.

4. अंडी जास्त खाल्याने धोका का वाढतो?

अंड्यांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. तसेच जास्त अंडी खाल्ल्याने शरीरातील एकूणच सगळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी असे अनेक रोगाचा धोका देखील जास्त वाढू होऊ शकतो. त्यामुळे अंडी प्रमाणात आणि गरज असल्यास रोज खावी.


हेही वाचा : कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करतील ‘हे’ सुपरफूड्स

- Advertisment -

Manini