पीरियड्स क्रॅम्प्स, बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी प्या आल्याचे पाणी

पीरियड्स क्रॅम्प्स, बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी प्या आल्याचे पाणी

बहुतांश लोक आपल्या दिवसाची सुरुवात अशा गोष्टींनी करतो की, त्यामुळे सकाळच मूड फ्रेश होतो. नेहमीच असे म्हटले जाते हेल्दी राहण्यासाठी हेल्दी खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. बहुतांश लोक सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम चहा किंवा कॉफी घेतात. परंतु उपाशी पोटी चहा-कॉफी घेतल्याने काही समस्या उद्भवू शकतात. त्याऐवजी तुम्ही आल्याचे पाणी पिऊ शकता.

पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेल्या आल्याचे पाणी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असे. स्वयंपाकघरात आल्याचा वापर विविध पदार्थांसाठी केला जातो. त्याचसोबत आल्याचा वापर आयुर्वेद आणि होम्योथीमध्ये ही केला जातो. कारण आलं हे अँन्टीऑक्सिडेंट आणि अँन्टी इंफ्लेमेटरी गुणांचे एक पॉवरहाउस आहे. जे तुमची त्वचा, केस आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याचे फायदे काय होतात हे आपण जाणून घेऊयात.

सध्या बहुतांश महिला पीएमएसच्या समस्येचा सामना करतात. अशातच तुम्ही आल्याचे पाणी पिऊ शकता. खरंतर एका संशोधनात असे समोर आले आहे की, आलं पीरियड्समधील क्रॅम्प्स कमी करण्यास मदत करते.

या व्यतिरिक्त जर तुम्हाला पचनासंबंधित समस्या असतील तर तुम्ही आल्याचे पाणी पिऊ शकता. दिवसातून दोन वेळेस आल्याचे पाणी प्यायल्याने तुम्हाला अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दिलासा मिळेल. तसेच शरीरात जर कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढला गेला असेल तरीही तुम्ही आल्याचे पाणी पिऊ शकता.


हेही वाचा- शरीरात एस्ट्रोजनचा स्तर वाढवतात ‘हे’ फूड्स

First Published on: September 24, 2023 12:12 PM
Exit mobile version