Monday, May 13, 2024
घरमानिनीHealthशरीरात एस्ट्रोजनचा स्तर वाढवतात 'हे' फूड्स

शरीरात एस्ट्रोजनचा स्तर वाढवतात ‘हे’ फूड्स

Subscribe

महिलांमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थला संतुलित ठेवण्यासाठी एस्ट्रोजन महत्त्वाची भुमिका निभावतो. एस्ट्रोजन हार्मोनला खरंतर महिलांचे हार्मोन असे म्हटले जाते. तर पुरुषांच्या शरीरात ही एस्ट्रोजन हार्मोन महत्त्वाचे मानले जाते. एस्ट्रोजन हार्मोन शरीरातील मेटाबॉलिज्म आणि बोन डेंसिटी प्रभावित करतो. जेव्हा आपल्या शरीरात एस्ट्रोजन हार्मोनचा स्तव वाढला जातो तेव्हा महिलांमध्ये कॅन्सर, अनियमित पीरिड्स, लो सेक्स ड्राइव, हेअर लॉस आणि माइग्रेनची समस्या उद्भवू शकते.

तर पुरुषांमध्ये एस्ट्रोजन हार्मोनटा स्तर वाढल्यास इंफर्टिलिटी आणि वंधत्व सारख्या समस्या उद्भवू शकतात. यापासून दूर राहण्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे डाएटमध्ये बदल करणे. तर शरीरात एस्ट्रोजनचा स्तर वाढण्यास नक्की कोणते फूड्स कारणीभूत असतात हे जाणून घेऊयात.

- Advertisement -

रेड आणि प्रोसेस्ड मीट
अशा प्रकारचे फूड खाल्ल्याने शरीरात एस्ट्रोजन तयार होते. खासकरून महिलांच्या शरीरात. काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, यामुळे महिलांना स्तनाचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. त्याऐजी प्लांट बेस्ड डाएट घ्यावा. असे केल्याने शरीरातील एस्ट्रोजनचा स्तर संतुलित राहतो.

रिफाइंड शुगर आणि कार्बोहाइड्रेटस
पॅक्स आणि प्रोसेस फूडमध्ये रिफाइंड शुगर आणि कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. अशा प्रकारचे फूड्स खाल्ल्याने शरीरात ब्लड शुगर आणि हार्मोनचा स्तर बिघडला जातो. त्यामुळे गरजेचे आहे की, तुम्ही कडधान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा.

- Advertisement -

डेअरी प्रोडक्ट्स
जनावरांपासून मिळणाऱ्या गोष्टींमध्ये एस्ट्रोजन असते. त्यामुळे गरेजेचे आहे की. तुम्ही मर्यादित प्रमाणात दूधापासून तयार करण्यात आलेले फूड्स खावेत. यामुळे शरीरातील हार्मोन्सचा स्तर नियंत्रित राहतो.

गोड पदार्थ
शुगर आपल्या शरीरातील काही हार्मोनशी जोडलेली असते. साखरेचे अत्याधिक प्रमाणात सेवन केल्यास फॅट सेल्स वाढले जातात आणि एस्ट्रोजनचा स्तर वाढू लागतो. या कारणास्तव एक्सपर्ट्स लो फॅट फूड खाण्याचा सल्ला देतात.


हेही वाचा- ‘या’ फूड्सने तुम्ही होता एंग्जायटीचे शिकार

- Advertisment -

Manini