वेळेवर Periods येत नसतील तर काय करावे?

वेळेवर Periods येत नसतील तर काय करावे?

सर्वसामान्यपणे महिलांना प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येते. परंतु मेनोपॉजनंतर ती पूर्णपणे बंद होते. आरोग्य तज्ञांचे असे मानणे आहे की, ज्या महिलांना नियमित रुपात मासिक पाळी येते त्या पूर्णपणे फिट असतात. पण ज्या महिलांमध्ये मासिक पाळी काही कालांतराने येत असल्यास ते योग्य नाही. अशा स्थितीत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. या व्यतिरिक्त काही गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.

-प्रेग्नेंसी टेस्ट करा


मासिक पाळी आली नाही तर विवाहित महिलांना असा सल्ला दिला जातो की, त्यांनी प्रेग्नेंसी टेस्ट करावी. खरंतर पीरियड्स आले नाही किंवा कंसीव करण्याच्या स्थितीत महिलांना पीरियड्स येत नाही. हा प्रेग्नेसीचा पहिला संकेत असतो. अशातच जर तुम्ही सेक्शुअली अॅक्टिव्ह महिला असाल तर पीरिड्स नियमत येतात आणि एखाद्या गोष्टीशिवाय पीरियड्स आले नाही तर वेळ न दवडता टेस्ट करुन घ्यावी.

-डाएटची काळजी घ्या


योग्य अन्नपदार्थ खाल्ल्याने त्याचा तुमच्या पीरिड्सवर प्रभाव पडतो. सध्याच्या काळात महिला हॉटेलमधले अन्नपदार्थ, प्रीजर्व्ड फूड आणि रेडी टू ईट पदार्थ खाणे पसंद करतात. अशा प्रकारच्या पदार्थांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते आणि यामुळे शरिराला नुकसान ही पोहचते. हेल्टी डाएट न घेतल्याने महिलांना पीरियड्स येण्यास समस्या उद्भवतात. म्हणजेच जर तुमचे पीरिड्स कालांतराने येत असतील तर तुमच्या खाण्यापिण्यात थोडा बदल करा.

-व्यायाम किंवा योगा करा


प्रत्येकालाच माहिती असते की, आजच्या तारखेला आपली बहुतांश काम ही स्क्रिनसमोर बसूनच होतात. याच कारणास्तव शरिराची हालचाल होत नाही. तज्ञांच्या मते, पीरिड्स न आल्यास महिलांनी आपल्या फिजिकल अॅक्टिव्हिटीवर लक्ष द्यावे. दररोज ३-४० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. यामुळे तुमचे पीरिड्स रेग्युलर होण्यास मदत होईल. व्यायाम करणे जमत नसेल तर योगा करा.

-डॉक्टरांचा सल्ला घ्या


जर तुमचे पीरियड्स सातत्याने पुढे-मागे होत असतील तर असे होणे योग्य नाही. अशातच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. गरज भासल्यास तुम्हाला डॉक्टर काही टेस्ट करण्यास ही सांगतील.


हेही वाचा- Tv बघताना खायला आवडतं? मग व्हा सावध

First Published on: May 8, 2023 3:49 PM
Exit mobile version