Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health Tv बघताना खायला आवडतं? मग व्हा सावध

Tv बघताना खायला आवडतं? मग व्हा सावध

Subscribe

सध्या सर्वांच्याच हातात टीव्हा रिमोट अथवा मोबाईल असतो. त्यावरच आपला बहुतांश वेळ जातो. काहीजणांना अशी सवय असते की, टीव्ही पाहताना आपल्या समोर काहीतरी खाऊ सोबत ठेवायचा. तो खाऊ टीव्ही पाहताना आरामात खायचा. असे करताना मज्जा येते खरी. पण तुमची हिच सवय तुम्हाला भारी पाडू शकते. याचा तुमच्यावर शारिरीक परिणाम होऊ शकतो.

काहीजण खुप तास एकाच ठिकाणी बसून समोर टीव्ही पाहत स्नॅक्स खातात. यामुळे शरिराची हालचाल न झाल्याने लठ्ठपणा वाढण्याची समस्या उद्भवते. या व्यतिरिक्त तुमच्या खाण्यापिण्यात बदल झाल्यास त्याचा परिणाम तुमच्या एकूणच आरोग्यावर होतो. काही विकार मागे लागतात.

- Advertisement -

परंतु एकदा वजन वाढले की, ते कम करण्यामागे ही लोक लागतात. त्यामुळे ते कमी खातात सुद्धा. यामुळे एनोरेक्सिया नर्वोसा होऊ शकते. तसेच लोक वेळोवेळी अधिक प्रमाणात खातात आणि नंतर अयोग्य पद्धतीने कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न करतात तर बुलिमिया नर्वोसा विकसित होतो. तुमच्या खाण्याच्या अशा सवयीमुळे बिग ईटिंग विकसित होते.

तरुण अथवा लहान मुलांना टीव्ही पाहणे, सोशल मीडियातील रिल्स, व्हिडिओ पाहणे फार आवडते. परंतु यामध्ये असे होते की, काही शिकण्यासारखे मोजकेच असते पण बसून बसून जो वेळ जातो त्याचा परिणाम तुमच्या शरिरावर होतो.

- Advertisement -

अशातच तुम्ही सुद्धा टीव्ही पाहताना काही ना काहीतरी खात असाल तर ही सवय आजच थांबवा. अन्यथा आरोग्याला त्याचा फटका बसू शकतो.


हेही वाचा- वयाच्या 30 वर्षांनंतर high heels नको रे बाबा !

- Advertisment -

Manini