पीरियड्सवेळी Pad रॅशेसपासून अशी मिळवा सुटका

पीरियड्सवेळी Pad रॅशेसपासून अशी मिळवा सुटका

Pad rashes remedies

पीरियड्सच्या दरम्यान बहुतांश महिलांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. पीरियड्स हे सर्वसामान्यपणे पाच-सहा दिवस राहतात. या दरम्यान महिलांना पीरियड्स क्रॅम्प्स सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पीरियड्स दरम्यान पॅड वापरले जातात. याच पॅड्स मुळे काहीवेळेस रॅशेसची समस्या उद्भवते आणि ते फार दुखते. यावेळी मांड्याच्या येथील त्वचा ही एकमेकांना अधिक घासली जाते आणि तेथील स्किनवर रॅशेस येतात. अशातच पीरियड्स दरम्यान रॅशेसच्या समस्येचा सामना तुम्ही सुद्धा करत असाल तर त्यावर काही घरगुती उपाय करु शकता. (Pad rashes remedies)

पीरियड्स रॅशेजमुळे प्रभावित स्किनच्या येथे खाज किंवा जळजळ फार होते. ही एक सामान्य बाब आहे. पण यावर वेळीच उपचार केले पाहिजेत. यासाठी नक्की काय केले पाहिजेत हे याच बद्दल आपण सविस्तर पाहूयात.

वारंवार पॅड्स बदला
पीरियड्स दरम्यान सर्वाधिक महत्वाचे म्हणजे पॅड्स बदलत राहणे. तुम्ही तुमच्या पॅड्सला 4-6 तासांनी बदलू शकता. यामुळे ओलावा आणि बॅक्टेरियाचे संक्रमण होत नाही. तसेच रॅशेसची समस्या दूर होते.

योग्य पॅड निवडा
पीरियड्स दरम्यान रॅशेसच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी योग्य ते पॅड निवजा. जेणेकरुन वजाइनाच्या येथे तुम्हाला ते लावल्यानंतर अनकंम्फर्टेबल वाटणार नाही. असे पॅड्स निवडा ज्यामुळे तुमच्या त्वचेला नुकसान होणार नाही. जेव्हा कधीही पॅड्स खरेदी कराल तेल्हा हाइपोएलर्जेनिक लेबल जरुर पहा.

हाइजीनची काळजी घ्या
पीरियड्स दरम्यान हाइजीन आणि स्वच्छतेची सुद्धा काळजी घ्या. वजाइनच्या आजूबाजूच्या स्वच्छतेसाठी कोमट गरम पाण्याचा वापर करा. अथवा क्लिंजर किंवा वाइप्सचा वापर ही करु शकता. यामुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल.

सैल कपडे घाला
पीरियड्स दम्यान तुम्ही पॅडचा वापर करत असाल तर सैल कपडे घाला. कारण घट्ट कपडे घातल्याने रॅशेसची समस्या वाढू शकते. सैल कपड्यांमुळे तुमच्या स्किनला आराम मिळतो आणि वजाइनच्या येथे हवा ही पास होते.

कोल्ड कॉम्प्रेसचा वापर करा
पीरियड्स दरम्यान जळजळ किंवा दुखत असेल तर तुम्ही स्वच्छ कपड्यात बर्फ घेऊन जळजळ होत असलेल्या ठिकाणी शेकवा. यामुळे सूज आणि जळजळ कमी होण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकते.(Pad rashes remedies)

डॉक्टरांचा सल्ला घ्या
पीरियड्स दरम्यान खुप रॅशेस होत असतील तर घरगुती उपयांव्यतिक्त ते बरे होत नसतील आणि काही केल्या जात नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.


हेही वाचा- Periods च्या डागांना ‘या’ प्रोडक्ट्सने करा गुड बाय

First Published on: May 31, 2023 1:41 PM
Exit mobile version