Wednesday, May 31, 2023
घर मानिनी Health Periods च्या डागांना 'या' प्रोडक्ट्सने करा गुड बाय

Periods च्या डागांना ‘या’ प्रोडक्ट्सने करा गुड बाय

Subscribe

पीरियड्स दरम्यान सॅनिटरी पॅड्सच्या डागांपासू दूर राहू शकता. परंतु अधिक ब्लड फ्लो वेळी डाग लागण्याची अधिक शक्यता असते आणि याची भीती सुद्धा वाटते. अशातच आम्ही तुम्हाला अशा काही मेंस्ट्रुअल हाइजीन प्रोडक्ट्स बद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे पीरियड्स दरम्यानच्या डागांना तुम्ही गुड बाय करु शकता.

मेंस्ट्रुअल डिस्क
मेंस्ट्रुअल डिस्क, मेंस्ट्रुअल कप प्रमाणे काम करते. याचा वापर १२ तासांपर्यंत केला जाऊ शकतो. परंतु एकदा वापरल्यानंतर तुम्हाला ते पु्न्हा वापरता येत नाही.

- Advertisement -

मेंस्ट्रुअल सी स्पंज
हे टॅम्पॉन प्रमाणेच काम करते. मेंस्ट्रुअल सी स्पंज वजाइना मध्ये टाकावे लागते. पीरियड्स दरम्यान तो स्पंज ब्लड शोषून घेतो. तो विविध रंग आणि आकाराचा सुद्धा मिळू शकतो.

पीरियड्स पॅन्टी
पीरियड्स पॅन्टी या पीरियड्सवेळी होणारा ब्लड फ्लो शोषून घतात. त्या घातल्यानंतर सामान्य पॅन्टी घालण्याची काहीच गरज नसते. त्या आरामदायी आणि महागड्या असतात.

- Advertisement -

मेंस्ट्रुअल कप
हा एक लहानसा सिलिकॉन कप असतो. तो 12 तासांपर्यंत ब्लड त्यात साठवून ठेवतो. जेव्हा ते योनितून काढले जाते तेव्हा त्यामधील ब्लड काढून तो स्वच्छ करुन पुन्हा वापरु शकता.

क्लोथ पॅड्स
तुम्ही सॅनिटरी पॅड्स ऐवजी याचा वापर करु शकता. पीरियड्स दरम्यान क्लोथ पॅड्स काही तास तुम्ही घालून ठेवू शकता.


हेही वाचा- Periods वेळी रॅशेजची समस्या उद्भवल्यास पॅड खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

- Advertisment -

Manini