Sunday, October 1, 2023
घर मानिनी Beauty हेल्दी केसांसाठी बटाटा आहे फायदेशीर; असा करा वापर

हेल्दी केसांसाठी बटाटा आहे फायदेशीर; असा करा वापर

Subscribe

भारतात बटाटा सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. बटाटा हा भारत आणि अमेरिकेत सर्वाधिक खाल्ला जाणारा लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे. इतकेच नाही बटाट्यांचे चिप्स आणि फ्राईज देखील मोठ्याप्रमाणात खाल्ले जातात. बटाट्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने देखील शरीराला ताकद देतात. बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही आढळतात.

Are potatoes good for people with diabetes? Let's find out | HealthShots

- Advertisement -

एका बटाट्यामध्ये 168 कॅलरीज, चार ग्रॅम प्रथिने, 0.2 ग्रॅम फॅट, 39 ग्रॅम कार्ब्स, तीन ग्रॅम फायबर, 1.83 मिलीग्राम आयरन, 888 मिलीग्राम पोटॅशियम आणि 12 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळतात. बटाट्यामध्ये आपल्या सर्वांना आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचा समावेश आहे.असा हा बटाटा फक्त शरीरासाठीच नाही तर आपल्या केसांच्या आणि चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी देखील खूप लाभदायक आहे.

केसांसाठी बटाट्याचा वापर कसा करावा?

How to make immunity-boosting potato juice at home and what are its benefits | The Times of India

  • जर तुम्हाला लांब सडक केस हवे असतील तर तुम्ही केसांच्या मुळाला बटाट्याचा रस लावू शकता. यामुळे केसांची मूळे मदबूत होतात आणि केस आतून मजबूत होतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तुमचे केस लांब होतात.
  • केसात कोंडा झाल्यास बटाट्याच्या रसामध्ये लिंबाचा रस मिक्स करुन तो केसांच्या मूळाशी लावावा. यामुळे केसातील कोंडा, खाज, इन्फेक्शन कमी होते.
- Advertisement -

Hot Oil Scalp Massage: Does it really help tackle hair fall? – Sesa Care

  • जर तुमचे केस खूप कुरळे असतील तर बटाट्यामध्ये मध आणि अंडे मिक्स करा. हे केसांना कंडिशनरप्रमाणे लावा. यामुळ तुमचे केस चमकदार आणि सुंदर होण्यासाठी मदत होते.
  • केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही हेअरमास्क बनवू शकता. यासाठी बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. यामध्ये एलोवेरा आणि खोबरेल तेल मिक्स करा. हा हेअरपॅक आठवड्यातून एकदा लावावा. यामुळे केस गळती हळूहळू बंद होईल.

हेही वाचा :

Pani Puri Recipe : घरच्या घरी बनवा टेस्टी पाणी पुरी

- Advertisment -

Manini