Tuesday, May 21, 2024
घरमानिनीतासनतास एकाच जागी बसणे शरीरासाठी घातक

तासनतास एकाच जागी बसणे शरीरासाठी घातक

Subscribe

कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही एकाच ठिकाणी बसत असाल तर ते शरीरासाठी धोक्याचे आहे. तासनतास एकाच जागी बसल्याने त्याचा फिटनेसवरही परिणाम होतो. अनेक ऑफिसेसमध्ये एकाच जागी जास्त वेळ बसून काम केले जाते पण या सवयीमुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यासाठी बसण्याची पद्धत जाणून घ्यायला हवी.

एकाच जागी बसल्याने शरीरावर होणारे परिणाम (Sitting in one place will affect the body)

 • एकाच जागी बसल्याने लठ्ठपणा तर वाढतोच, शिवाय पाठदुखीची समस्या प्रामुख्याने जाणवू लागते.
 • एकाच जागेवर बसल्याने पायांमधील रक्तप्रवाह कमी होतो. याने पायांना सूज येऊ शकते. तसेच एकाच जागी बसल्याने ऑस्टिओपोरोसिस होण्याचा अर्थात हाडे कमजोर होण्याचा धोका अधिक तीव्र होतो.
 • साधारणतः खुर्चीवर तासनतास बसल्याने पाठीच्या मसल्सवर आणि हाडांवर परिणाम होतो. याने शरीराचे पोश्चर म्हणजेच शरीराची ठेवण बिघडू शकते.
 • चालण्याने- फिरल्याने मेंदू फ्रेश राहण्यास मदत होते. याने मेंदूला ऑक्सिजन आणि योग्य प्रमाणात रक्त पोहोचण्यास मदत होते. पण, जेव्हा तुम्ही एकाच जागी बसता तेव्हा मेंदूवर याचा परिणाम होऊन मेंदू सुस्त होतो.
 • बराच वेळ बसल्याने पायातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही. ज्याने पाय सुन्न होणे, पायांना मुंग्या येण्याची समस्या उदभवते.
 • जे पुरुष दिवसातून 2 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसतात आणि जे व्यायाम करत नाही अशा पुरुषांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.
 • जास्त वेळ एकाच जागी बसल्याने ब्लड प्रेशर वाढण्याचा त्रास जाणवू शकतो. तसेच तुमचे कोलेस्ट्रॉलही वाढू शकते.
 • तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल आणि तुम्ही जास्त वेळ एकाच जागी बसत असाल तर तर तो आणखीनच वाढू शकतो.
 • एका संशोधनानुसार, जे लोक जास्त वेळ एकच जागी बसतात त्यांना कोलन कॅन्सरचा धोका अधिक असतो.

एकाच जागी बसून काम करावे लागत असेल. तर बसण्याच्या पद्धतीवर लक्ष द्यायला हवे. तुम्ही योग्य स्थिती बसल्यास त्याचा तुमच्या शरीरावर होणार गंभीर परिणाम टाळता येईल.

- Advertisement -

अशी ठेवा बसण्याची पद्धत (This is the way to sit)

 1. खांदे सैल ठेवा.
 2. पुढे वाकून बसा.
 3. कमरेच्या खालच्या बाजूला सपोर्ट देण्याचा प्रयन्त करा

 

 

- Advertisement -

हेही पहा : Summer Heat : उन्हामुळे डोळे लाल होतात, अशी घ्या काळजी

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini