Saturday, September 30, 2023
घर मानिनी Kitchen कुकरच्या शिटीतून पाणी येते, मग वापरा 'या' ट्रिक्स

कुकरच्या शिटीतून पाणी येते, मग वापरा ‘या’ ट्रिक्स

Subscribe

बहुतांशवेळा कुकरमध्ये जेवण बनवताना त्याच्या रबर किंवा शिटीच्या येथून पाणी येऊ लागते. याच कारणास्तव कुकर आणि किचन सुद्धा खराब होते. अशातच काही ट्रिक्सच्या मदतीने या समस्येपासून दूर राहू शकता. (Pressure cooker hacks)

रबर पहा

- Advertisement -


काही वेळेस असे होते की, कुकरच्या झाकणाला जो रबर लावला जातो तो कधीकधी फाटला जातो. अथवा सैल होतो. अशातच रबर वेळोवेळी तपासून पहा.

पीठाचा गोळा लावा

- Advertisement -


जर रबर सैल झाला असेल तर त्यावर तुम्ही पीठाचा गोळा किंवा टेप लावून तो सील करू शकता. यामुळे पाणी बाहेर येणार नाही.

शिटी तपासून पहा


रबर तपासून पाहण्यासह कुकरची शिटी सुद्धा वेळोवेळी तपासून पहावी. जर कुकरची शिटी स्वच्छ नसेल तर शिटीतून वाफ येत नाही. त्यामुळेच पाणी बाहेर पडू शकते.

तेल लावा


जर कुकरच्या शिटीतून पाणी बाहेर येत असेल तर झाकण लावण्यापूर्वी त्याच्या किनाऱ्यावर तेल लावा.

थंड पाण्याने धुवा


बहुतांशवेळा कुकरचा रबर सैल होतो आणि पाणी बाहेर येते. रबर थंड पाण्यात रबर बुडवून ठेवा आणि नंतर लावा. असे केल्याने पाणी बाहेर येणार नाही.

मध्यम आचेवर ठेवा


कुकरमध्ये जेवण नेहमीच मध्यम आचेवर शिजवा. गॅसची आच अधिक असेल तर पाणी बाहेर येते. त्याचसोबत एक उकळी आल्यानंतर कुकरचे झाकणं लावा.

अधिक पाणी टाकू नका


बहुतांशवेळा पाणी अधिक टाकल्यानेसुद्धा कुकरच्या शिटीमधून पाणी बाहेर येऊ शकते. अशातच कुकर मध्ये पाणी योग्य प्रमाणात टाका.


हेही वाचा- Kitchen Tips : किचन साफ करताना ‘या’ टिप्स करा फॉलो…

- Advertisment -

Manini