Tuesday, May 14, 2024
घरमानिनीRecipeKitchen Tips : किचन साफ करताना 'या' टिप्स करा फॉलो...

Kitchen Tips : किचन साफ करताना ‘या’ टिप्स करा फॉलो…

Subscribe

स्वयंपाकासोबतच स्वयंपाकघरातील स्वच्छतेची काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. असे केले नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. तसेच यामुळे घर सुद्धा अस्वच्छ राहते. घरातील घाण वाढते आणि यामुळे स्वयंपाकघर साफ करण्यास अतिशय वेळ जातो. तसेच स्वयंपाकघरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा स्वच्छतेने वापर न केल्यास अन्नातून आपल्याला विषबाधा होण्याचा धोका असतो.

त्याचबरोबर अनेक वेळा आपण सकाळी उठून चाकू न धुता वापरतो. अशावेळी याचा परिणाम लगेच आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवावे. गॅस, सूरी, भांडी याचा वापर सारखा होत असतो. त्यामुळे यांची विशेष स्वच्छता घेणे गरजेचे आहे. अशातच ‘या’ टिप्स वापरून किचन ठेवा साफ आणि स्वच्छ.

- Advertisement -

How to clean a stove top including glass, gas and electric stoves

1. स्वयंपाक करण्यापूर्वी ओटा स्वच्छ करा

स्वयंपाक करण्यापूर्वी ओटा पूर्णपणे स्वच्छ करणे हे स्वयंपाकघरातील महत्वाचे काम आहे. बहुतेक लोक स्वयंपाक केल्या नंतरच ओटा स्वच्छ करतात. पण स्वयंपाक करण्यापूर्वी ओटा साफ करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

2. स्वयंपाकघर नियमितपणे स्वच्छ करत रहा

उरलेले अन्न स्वयंपाकघरात उघडे ठेवू नका. ताबडतोब फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा. असे केल्याने स्वयंपाकघर स्वच्छ राहील. तसेच, दररोज स्वयंपाकघर झाडून आणि पुसून ठेवा. तसेच आठवड्यातून किमान एकदा तरी स्वयंपाकघरातील लादी स्वच्छ धुवून घ्या.

3. स्वयंपाकघरातील डस्टबिन नेहमी स्वच्छ ठेवा

आपले स्वयंपाकघर व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी डस्टबिन नेहमी स्वच्छ करा. यामुळे तुमच्या किचनमधून येणारा वास तर कमी होईलच, शिवाय माश्या आणि किडे येण्यापासून याचा बचाव होईल. यासाठी डस्टबिन नेहमी स्वच्छ ठेवा आणि डस्टबिनमध्ये वापरण्यात येणारी बॅग रोजच्या रोज बदलावी. जेणेकरून कचऱ्याचा घाण वास घरभर येणार नाही.

Correct Steps for Cleaning & Sanitizing Utensils by Hand | LoveToKnow

स्वयंपाक घरात जेवण बनवताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष….

  • जेवण तयार करण्यापूर्वी नेहमी हात स्वच्छ धुवा.
  • चॉपिंग बोर्ड आणि चाकू धुवून वापरा.
  • मांस, मासे आणि दुग्धजन्य पदार्थ रेफ्रिजरेट करा आणि पॅकेजिंग तारखेपर्यंत त्यांचा वापर करा.
  • जेवण्यापूर्वी संपूर्ण जेवण व्यवस्थित गरम करा.
  • किचनचे सिंक तसेच किचनची बाजू साफ करायला विसरू नका.
  • गॅसचा चिकटपणा काढून टाकण्यासाठी क्लिंजर वापरा.
  • गॅसचा बर्नर बाहेर काढून त्याला साबण आणि पाण्याने स्वच्छ करा.

हेही वाचा :

अॅल्युमिनियम,स्टिल नाही तर ‘या’ भांड्यात जेवण बनवल्याने राहाल हेल्दी

 

 

 

- Advertisment -

Manini