Thursday, May 16, 2024
घरमानिनीWomen's Day 2024 : रेल्वेत महिलांची सुरक्षा करणार 'मेरी सहेली'

Women’s Day 2024 : रेल्वेत महिलांची सुरक्षा करणार ‘मेरी सहेली’

Subscribe

महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. ट्रेन असो किंवा बस, महिला कुठेही सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून अनेक प्रकारच्या योजना आणल्या जातात. “मेरी सहेली योजना” ही देखील एक योजना आहे ज्यामध्ये महिलांना प्रवास करताना सुविधा पुरविल्या जातील. रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांना सुरक्षा देण्यासाठी आरपीएफने देशभरात ‘मेरी सहेली’ योजना सुरू केली आहे.

या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार?

या योजनेचा लाभ रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना आणि विशेषतः ट्रेनमध्ये एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना मिळणार आहे. ट्रेनमध्ये एकट्या असलेल्या महिलांच्या छेडछाडीची अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांना काळजी करण्याची गरज नाही. मेरी सहेली योजना ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांची ओळख करून त्यांना विशेष संरक्षण देईल. याशिवाय त्या महिलांवरही नजर ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

महिला प्रवाशांना कसा फायदा होईल?

मेरी सहेली योजनेच्या संघात फक्त महिलाच असतील. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या इतर महिलांची काळजी फक्त महिलाच घेतील. ही टीम एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना त्या कुठे जात आहेत, त्यांना कोणी त्रास देत आहे का, त्यांना ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत आहे का, अशी प्रश्न विचारू शकतात.

हेल्पलाइनद्वारे टोल फ्री क्रमांक

महिला प्रवाशांशी संवाद साधताना हे पथक आरपीएफ सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक 182 , जीआरपी हेल्पलाइन क्रमांक 1512 या द्वारे संपर्कात राहतील. तसेच सुरक्षेच्या इतर सूचना देतील.

- Advertisement -

या गाड्यांचा समावेश

मध्य रेल्वेच्या 24 गाड्यांमध्ये ‘मेरी सहेली’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात मुंबई-नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस, गोदान एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई विशेष, मुंबई-हावडा एक्स्प्रेस, पुणे-पाटणा विशेष या गाड्यांचा समावेश आहे.

__________________________________________________

हेही वाचा : Women’s day 2024 : ‘वूमन्स डे’ला फिरण्याचा प्लॅन करताय? बिनधास्त जा ‘या’ ठिकाणी

- Advertisment -

Manini