तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवता का? त्याआधी हे वाचा

तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवता का? त्याआधी हे वाचा

तुम्हीही अंडी फ्रिजमध्ये ठेवता का? त्याआधी हे वाचा

भूक लागल्यावर झटपट काही बनवायच असेल तर एक सोप्पा पदार्थ म्हणजे अंडी. झटपट अंड्याचे ऑमलेट तयार करुन आपण खाऊ शकतो. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. त्याचा आपल्या शरिराला मोठा फायदा होतो. बऱ्याच जणांच्या घरातील फ्रिज अंड्यांनी भरलेला असतो. अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने ती फ्रेश राहतात असे आपल्याला वाटते. मात्र अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचा आपल्या स्वास्थ्यावर परिणाम होतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाण्यासाठी वापरु नये असे या अभ्यासातून सांगण्यात आले आहे.

या अभ्यासातून असे सांगण्यात आले आहे की, बाहेर ठेवण्यात आलेली अंडी हि ७ ते १० दिवस चांगले राहू शकतात. मात्र फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी ३० ते ४० दिवस चांगली राहू शकतात. मात्र फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाणे आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक ठरु शकतात. अंड्यामध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड त्याचबरोबर पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, सोडीयम यांसारखे महत्त्वाचे घटक असतात. त्याचबरोबर व्हिटिमिन्स ६ आणि १२ असतात. मात्र अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर त्यातील हे सर्व घटक अंड्यात राहतील असे नाही.

बऱ्याचदा फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी आपण उकडण्यासाठी ठेवतो. मात्र फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी उकडताना ती अंडी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी उकडण्यापूर्वी थोडा वेळ बाहेर काढून ठेवावी. त्याचप्रमाणे फ्रिजमध्ये ठेवलेली अंड्यांमध्ये बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले अन्य पदार्थही खराब होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अंड्यांची चवही बदलते.

जर तुम्ही रोज अंडी खात असाल तर शक्यतो फ्रेश अंडी खा. बराच काळ फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाणे टाळा. फार काळ फ्रिजमध्ये ठेवलेल्या अंड्यांच्या पदार्थांची चवही बदलते. अंडी उकडताना ते फुटणार नाही याकडे विशेष लक्ष द्या. खराब अंड्याचा आपल्या किडणी आणि ह्रदयावर मोठा परिणाम होतो.


हेही वाचा – तुम्हालाही रात्री उशिरा भूक लागते का? तर खा ‘हे’ पदार्थ

First Published on: March 1, 2021 10:11 PM
Exit mobile version