Receipe : संध्याकाळच्या चहासोबत खा चटपटीत मसाला भेळ

पावसाळ्यात आपल्या वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेण्याची इच्छा होते. अशावेळी अनेकजण चहासोबत कांदा भजी, बटाटा वड्यांचा आस्वाद घेतात. मात्र कधी कधी आपल्याला स्वयंपाक घरात जाऊन काहीतरी बनवायचा कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही केवळ ५ मिनिटात चटपटीत भेळ बनवू शकता.

चटपटीत मसाला भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

 • ४ वाटी फरसाण
 • ४ वाटी मुरमरे
 • ६-७ पापडी
 • १ कांदा (बारीक चिरलेला)
 • १ टोमॅटो (बारीक चिरलेला)
 • १/२ वाटी भाजलेले शेंगदाणे
 • एक चिमूटभर चाट मसाला
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • ३ चमचे सॉस
 • १/२ चमचा लिंबाचा रस
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर (बारीक चिरलेली)

कृती :

 • सर्वप्रथम एका भांड्यात मुरमुरे, फरसाण, कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेल्या मिरच्या, सॉस एकत्र करून घ्या.
 • आता त्यात चाट मसाला, मीठ, लिंबाचा रस घालून मिक्स करा.
 • आता त्यात पापडी कोथिंबीर घालून सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :Receipe : यावेळी उपवासात साबुदाणा अप्पे नक्की ट्राय करा