घरमहाराष्ट्रPolitics : महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; गुरुवारी दिल्लीत बैठक

Politics : महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; गुरुवारी दिल्लीत बैठक

Subscribe

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रखडलेली भाजपा, शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) महायुतीची रखडलेली जागा वाटपाची चर्चा गुरुवारी (21 मार्च) दिल्लीत होत असून या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याआधी तीन वेळा महायुतीची बैठक रद्द झाली होती. (Politics Chances of sealing the seat allocation of the Grand Alliance Meeting in Delhi on Thursday)

हेही वाचा – Devendra Fadnavis : माझी काही इमेज ठेवा; संजय राऊतांबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचे मिश्किल भाष्य

- Advertisement -

महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीला भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 27 मार्च 2024 अशी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जागा वाटपाचा निर्णय लवकर घ्यावा यासाठी आग्रह धरला आहे. पक्षाला 9 ते 10 जागा मिळाव्यात अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. यासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन येत्या एक ते दोन दिवसात जागा वाटप जाहीर होईल, असे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले की, ज्यावेळी महायुतीचे जागावाटप होईल त्यावेळी ते सन्मानजनक असेल. महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वाधिक जागा कशा जिंकता येतील याबाबत सर्वंकष विचार सुरू आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागत आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी…; अजितदादांचे मिश्किल भाष्य

शिवतारेंची स्क्रीप्ट कुणी लिहिली त्याचा शोध घेत आहोत

विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेवरून बोलताना तटकरे म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा कणा आहेत. ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होती, त्यावेळी पुरंदरची जागा कॉंग्रेसकडे होती. त्या निवडणुकीत शिवतारेंनी शरद पवार यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे अजित पवार चिडले होते आणि त्यांनी शिवतारेंना आव्हान दिले होते. तेव्हा अजित पवार हे आघाडी आणि पक्ष वाचविण्यासाठी बोलले होते. ते चुकीचे काही वागले नाहीत. त्यामुळे शिवतारे जे बोलत आहेत त्याची दखल मुख्यमंत्री घेतील आणि योग्य तो मार्ग काढतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. तसेच शिवतारे जे बोलत आहेत, त्यांची स्क्रीप्ट कुणी लिहिली याचा आम्ही शोध घेत आहोत, असेही म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -