डाएट असो किंवा नाश्ता त्यामध्ये पौष्टिक पदार्थ खावेत असे म्हटले जाते. अशातच तुम्ही हेल्दी असा बीटाचा उत्तपम झटपट तयार करु शकता. चला तर पाहूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. (Beetroot Uttapam Recipe)
साहित्य-
-अर्धा किलो डोसा पीठ
-1 बारीक चिरलेला कांदा
-1 बारीक चिरलेला टोमॅटो
-1-2 बारीक चिरलेल्या मिर्च्या
-बारीक चिरलेलील कोथिंबीर
-चवीनुसार लाल तिखट
-1 किसलेला बीट
-2-3 टिस्पून तेल
कृती-
सर्वात प्रथम तुमच्याकडील नॉन स्टिक तवा घेऊन त्यात 1-2 टिस्पून तेल टाका. गॅस यावेळी मंद आचेवरच ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यावर डोसाचे पीठ टाका आणि ते व्यवस्थितीत गोलाकार पसरुन घ्या. आता त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिर्च्या, किसलेला बीट आणि कोथिंबीर टाका. वरुन लाल तिखट (ऑप्शनल) टाका. असे केल्यानंतर तुम्ही त्यावर पुन्हा तेल थोडं टाकून उत्तपम एका बाजूने शिजू द्या.
खालील बाजूने शिजल्यानंतर तो उलट करा आणि तेथे थोडावेळ शिजू द्या. पुन्हा तो उलट करा आणि गॅस बंद करा. अशा प्रकारे तुमचा हेल्दी असा बीटाचा उत्तपम तयार.
हेही वाचा- ब्रेकफास्टसाठी बनवा टेस्टी असा टोमॅटो, ओनियन उत्तपम