Thursday, February 22, 2024
घरमानिनीKitchenUttapam Recipe : नाश्त्यासाठी झटपट बनवा ब्रेडचा उत्तपा

Uttapam Recipe : नाश्त्यासाठी झटपट बनवा ब्रेडचा उत्तपा

Subscribe

रोज रोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन सगळेच कंटाळतात. यामुळे महिलांना नाश्त्यासाठी रोज काय बनवायचं असा प्रश्न पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हांला झटपट बनणारा ब्रेडचा उत्तपा ही रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :

 • 4 ब्रेड स्लाईस
 • 1/2 कप रवा
 • 2 मोठे चमचे मैदा
 • 1/2 दही
 • 1 मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट
 • 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा
 • 1/2 बारीक चिरलेली शिमला मिरची
 • 2-3 हिरव्या मिरच्या
 • 1/2 अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
 • मीठ चवीनुसार
 • तेल

कृती :

Quick and Easy Healthy Indian Breakfast Recipe : Bread Uttapam!! | Zayka Ka Tadka - By Vijay Haldiya has moved to zaykakatadka.com

- Advertisement -
 • सर्वप्रथम ब्रेडची किनार कापून टाका. नंतर ब्रेडच्या स्लाईसवर पाणी शिंपडून ती कुस्करून घ्या.
 • त्यानंतर एका बाऊलमध्ये ब्रेडचा लगदा घ्या. त्यात रवा, मीठ, दही टाका. नंतर भाज्या टाकून मिश्रण एकत्र करा.
 • गरज वाटल्यास थोडं पाणी टाका. नंतर तवा गरम करून त्यावर गरमा गरम उत्तपे बनवा.
 • सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर उपत्ता सर्व्ह करा.

हेही वाचा :

उरलेल्या भाज्यांपासून बनवा कटलेट

- Advertisment -

Manini